वैज्ञानिक परीक्षेत वैनतेयच्या विद्यार्थ्यांचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 04:51 PM2019-03-19T16:51:35+5:302019-03-19T16:52:59+5:30
निफाड : मुबंई येथील द ग्रेटर सायन्स टीचर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत निफाड येथील वैनतेय विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना सिल्व्हर पदक मिळाले आहे .
निफाड : मुबंई येथील द ग्रेटर सायन्स टीचर्स असोसिएशन यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय डॉ होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेत निफाड येथील वैनतेय विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांना सिल्व्हर पदक मिळाले आहे .
विद्यार्थ्यांच्या सुप्त कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी , वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासण्यासाठी ही स्पर्धा राज्यपातळीवर घेण्यात आली होती या स्पर्धा तीन टप्प्यात घेण्यात आल्या पहिली लेखी परीक्षा नाशिक येथे झाली. या परीक्षेत वैनतेय विद्यालयाचे २३ विद्यार्थी बसले होते . यातील १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले मात्र या १८ मधील पाच विद्यार्थ्यांची दुसर्या टप्प्यातील विज्ञान प्रात्यिक्षक परीक्षेसाठी निवड झाली. या पाच विद्यार्थ्यांची प्रात्यिक्षक परीक्षा पुणे येथे झाली या परीक्षेत या विद्यालयाचे पाचपैकी देवेश श्रीकांत गुजराथी व प्रियाणी भूषण सोनवणे हे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या दोन विद्यार्थ्यांची निवड मुंबई येथे होणार्या राज्यस्तरीय तोंडी व प्रोजेक्ट परीक्षेसाठी झाली देवेश गुजराथी याने शून्य घन कचरा व्यवस्थापन तर प्रियानी सोनवणे हिने नक्षत्र वनातून वृक्षलागवड व संगोपन व ओषधी वनस्पती या विषयावर प्रोजेक्ट सादर केले होते