७७ हजार कुटुंबांना वनवासी कल्याण आश्रमाची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:12 AM2021-01-04T04:12:57+5:302021-01-04T04:12:57+5:30

नाशिक : जनजाती समाजाला स्वावलंबी स्वाभिमानी आणि संघटित करण्याचे कार्य वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात होत आहे. संपूर्ण ...

Vanvasi Kalyan Ashram helps 77,000 families | ७७ हजार कुटुंबांना वनवासी कल्याण आश्रमाची मदत

७७ हजार कुटुंबांना वनवासी कल्याण आश्रमाची मदत

Next

नाशिक : जनजाती समाजाला स्वावलंबी स्वाभिमानी आणि संघटित करण्याचे कार्य वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात होत आहे. संपूर्ण भारतभरातील २०८ जिल्ह्यातील ७७ हजारांपेक्षा अधिक कुटुंबांनी कल्याण आश्रमाच्या विविध सेवा योजनांचा लाभ घेतला असून, १७० जनजातीपर्यंत आणि २३ अतिमागास जनजातींपर्यंत कल्याण आश्रमाचा सतत संपर्क असल्याचे कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटन मंत्री अतुल जोग यांनी सांगितले.

समर्पित कार्यकर्ता व त्याच्यातील सातत्य हेच अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या विस्ताराचे गमक असल्याचे प्रतिपादन कल्याण आश्रमाचे राष्ट्रीय संघटन मंत्री अतुल जोग यांनी केले. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी संस्थेचे कार्य विशद केले. अखिल भारतीय पातळीवर कल्याण आश्रमाचे तब्बल ४५१० शैक्षणिक प्रकल्प सुरू असून १,३८,५७० लाभार्थी कल्याण आश्रमाच्या विविध सेवाकार्यांचा लाभ घेत आहेत. त्यात खेलकूद केंद्रे, सांस्कृतिक केंद्रे, स्वमदत गट ग्राम विकास प्रकल्प, आरोग्य शिबिरे, ग्रामीण आरोग्यरक्षक योजना यासारख्या विविध कार्यांचा समावेश आहे. कोरोना काळातही कल्याण आश्रमाने आपले दायित्व अत्यंत चोखपणे बजावून दुर्गम व अतिदुर्गम भागात धान्य शिधा तसेच बी-बियाणे व खते यांचे वितरण केलेले आहे. जनजातीय समाजाच्या विद्यार्थ्यांबद्दल बोलताना ते म्हणाले की, केवळ पुस्तकी ज्ञानच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातही जनजाती समाजाने असामान्य कर्तृत्व दाखवलेले आहे. त्यांच्यातील सुप्त गुणांचा शोध घेत, त्यांचा विकास करण्याचे महत्त्वाचे कार्य कल्याण आश्रम पार पाडीत आहे. शहरी व ग्रामीण क्षेत्रातील हजारो समर्पित कार्यकर्ते हे आपापल्या क्षेत्रात पाय रोवून भक्कमपणे उभे राहिलेले आहेत. त्यांच्याच बळावर वनवासी क्षेत्राच्या प्रत्येक कोपऱ्यात हे कार्य पोहोचू शकेल व प्रत्येक समस्येला तोंड देऊ शकेल असे देशव्यापी संघटन उभारण्यात कल्याण आश्रम यशस्वी ठरलेले असल्याचे आश्रमाचे महाराष्ट्र प्रांत सचिव शरद शेळके उपस्थित होते.

Web Title: Vanvasi Kalyan Ashram helps 77,000 families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.