त्र्यंबकेश्वरला स्वच्छतेसाठी विविध उपक्रम

By admin | Published: September 21, 2016 11:41 PM2016-09-21T23:41:28+5:302016-09-21T23:42:58+5:30

स्वच्छता अभियान : डेपोचा प्रश्न प्रलंबित असल्याने रस्तोरस्ती कचरा साठल्याने दुर्गंधी

Various activities for cleanliness in Trimbakeshwar | त्र्यंबकेश्वरला स्वच्छतेसाठी विविध उपक्रम

त्र्यंबकेश्वरला स्वच्छतेसाठी विविध उपक्रम

Next

त्र्यंबकेश्वर : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहरात ‘स्वच्छ त्र्यंबकेश्वर अभियान’ राबविण्याचा निर्णय यापूर्वी प्र. नगराध्यक्ष संतोष कदम, मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे केरूरे यांनी सुरू केले आहे. यासाठी कार्यालयीन कर्मचारी शहरात फिरून समुपदेशन, जनजागरण करीत आहेत. लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत लहान मुलांना रस्त्यावर बसविण्याचे दुष्परिणाम, कचरा कुंडीविरहित मोहल्ला ही संकल्पना राबविली जात आहे. नगराध्यक्ष विजया लढ्ढा यांनी हे अभियान राबविण्यास खऱ्या अर्थाने चालना दिली.
त्र्यंबकेश्वर शहराचा कचरा डेपोचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्र्यंबक नगरपालिकेची कचराडेपोची जागा होती; पण अनेक वर्षे त्या जागेकडे दुर्लक्ष केल्याने त्या जागेचा वापरच झाला नाही. आता त्या ठिकाणी नागरी वस्ती झाल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने त्या जागेचा वापर करता येईना. पालिकेने अनेक ठिकाणी त्र्यंबकेश्वर परिसरात १० कि.मी. पेक्षा जास्त अंतराच्या जागा पसंत केल्या. पण तेथील गावकऱ्यांच्या विरोधामुळे प्रदूषणाच्या कारणाखाली जागांचा वापर करता येईना.कोचुर्ली येथील गावापासून दूर असलेल्या सुमारे पाच एकर सरकारी जागेचा वापर करता येईना. तो सातबारा तर पालिकेच्या नावावर आहे. अशा एक ना एक अडचणी आल्यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न पालिकेचा अद्यापही अधांतरीच आहे. अशाही परिस्थितीत सध्या असलेल्या कचरा डेपोने खड्डा खोदून त्यात कचरा विल्हेवाट कारण्यात येत आहे. अर्थात हे डेपोची समस्या सुटणे गरजेचे आहे.आज मुख्याधिकारी यांच्यासह सर्व सफाई कर्मचारी कार्यालयीन कर्मचारी आदि घरोघर जाऊन सफाईबाबत जनजागरण, सफाईचे महत्त्व समजावून सांगत आहेत. रस्त्याच्या बाजूला लहान मुलांना शौचास बसवू नये, अगर अशी मुले आढळल्यास त्यांच्या पालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल याची जाणीव करून देण्यात येत आहे .(वार्ताहर)
पालिकेतर्फे तसे सहकार्यच मिळत असते. कचरा विल्हेवाटीच्या बाबतीत गावाला एक प्रकारे शिस्तच लागली आहे. विद्यमान मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे केरुरे यांनी येथे आल्यापासून अनेक बाबतीत शिस्त लावली. आता महिला बचतगट किंवा सामाजिक कार्याची आवड असलेल्या महिलांना ‘स्वच्छतादूत’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या दूतांमार्फत प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करताना दुकानदार आढळल्यास मोबाइलमध्ये फोटो काढून पालिकेत देण्याबाबत सुचविण्यात आले आहे.
नळावर भांडी घासणे, कपडे धुणे, पाण्याचा गैरवापर, कचरा रस्त्यावर अस्ताव्यस्त फेकणे, रस्त्यावर शौचास बसविणे वगैरे बाबींना दंडनीय करविले असून, असे वागणाऱ्यांचे छायाचित्र मोबाइलमध्ये काढणे हे सर्व काम स्वच्छतादूत करणार आहेत, असे सर्वंकष प्रयत्न सुरू आहेत.
कचराकुंडीविरहित मोहल्ला’ ही संकल्पना राबविण्यात आल्याने एक प्रकारे शिस्त लागली आहे. त्यामुळे प्रत्येक घरी कचरा जमा करण्यासाठी डबे ठेवण्यात येऊन घंटागाडीत कचरा जमा होत असतो. भाजी व्यापाऱ्यांनीदेखील असे डशबिन वापरणे सुरू केले आहे. प्रत्येक जण आता घरोघर शौचालय बांधत आहे. ज्यांची ऐपत नाही अशा गरिबांना पालिकेतर्फे रु. १७ हजार अनुदान दिले जात आहे. बीपीएल कुटुंबांना रु. दीड लाख दिले जात आहे. पहिल्या टप्प्यातील लाभार्थी संपले
आहेत.

Web Title: Various activities for cleanliness in Trimbakeshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.