शिक्षकदिनी जिल्ह्यात विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 03:06 PM2019-09-05T15:06:10+5:302019-09-05T15:06:27+5:30
पेठ : भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पेठ जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षक दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
पेठ : भारताचे प्रथम राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पेठ जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये शिक्षक दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने तालुक्यातील सहा शिक्षकांचा सभापती पुष्पा गवळी यांचे हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी उपसभापती तुळशिराम वाघमारे, सदस्य विलास अलबाड, नंदू गवळी, गटविकास अधिकारी अनिल भुसावरे, गट शिक्षणाधिकारी सरोज जगताप, अधिक्षक विलास साळी, विस्तार अधिकारी वसंत खैरणार, प्रशांत जाधव, सुनिता जाधव, धनश्री कुवर, कळंबे, मंगला गवळी यांचे सह केंद्रप्रमूख, शिक्षक, कर्मचारी, विषयतज्ञ उपस्थित होते. मोहदांड येथील विद्यार्थ्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून शिक्षक दिन कार्यक्र मात सहभाग घेतला. तालुक्यातील प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक दिनानिमति प्रतिमापूजन, विद्यार्थी- शिक्षक, शिक्षक सन्मान आदी विविध उपक्र म घेण्यात आले. जिल्हा परिषदेच्या वतीने तालुक्यातील धनराज सगणे व उत्तम गवळी यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार तर कलावती भंडागे व छबीबाई सहारे यांना सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.