विद्यार्थ्यांकडून विविध कलाविष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 04:42 PM2020-01-10T16:42:39+5:302020-01-10T16:44:10+5:30
सटाणा:विद्यर्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करणे काळाची गरज आहे.पाठ्यपुस्तकातील अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांाना कलागुणांच्या सादरीकरणासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चषक, तालुका क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धा महत्त्वाची भूमिका निभावत आहे. आगामी काळात अशा स्पर्धा व्यापक स्वरूपात राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी केले. यावेळी बागलाण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले कलाविष्कार पाहून आमदार बोरसे यांनी समाधान व्यक्त केले.
येथील जिल्हा परिषद अध्यक्ष चषक, बागलाण तालुका क्र ीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आमदार बोरसे बोलत होते.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी बागलाण पंचायत समितीच्या सभापती इंदूबाई ढुमसे होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून उपसभापती कान्ह ूअ हिरे, जिल्हापरिषद सदस्य लता बच्छाव, कान्हू गायकवाड, ज्योती अहिरे व पंचायत समितीचे सर्व सदस्य तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पी एस कोल्हे व सहायक गटविकास अधिकारी हेमंतकुमार काथेपूरी उपस्थित होते.
स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना एकित्रतरीत्या पाच हजार रु पयांचे बक्षीस दिले. यावेळी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून आमदार बोरसे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या कार्यक्र मासाठी बागलाण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी टी. के. घोंगडे, शिक्षण विस्तार अधिकारी विजय पगार, बागलाण तालुक्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांचे सर्व केंद्रप्रमुख मुख्याध्यापक,शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
@
विविध सांस्कृतिक कार्यक्र मांचे एकामागून एक सादरीकरण होत असताना जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून आमदार दिलीप बोरसे थेट विद्यार्थ्यांंमध्ये जाऊन बसले. मंचावरून आमदार बोरसे विद्यार्थ्यांमध्ये बसताच टाळ्यांचा कडकडाटने त्यांचे स्वागत केले.