आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून लवकरच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 04:54 PM2020-06-10T16:54:23+5:302020-06-10T16:59:09+5:30
नाशिक : कोविड आजारासाठी उपचारादरम्यान आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल व तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्याकरिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान ...
नाशिक : कोविड आजारासाठी उपचारादरम्यान आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कुशल व तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. त्याकरिता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून लवकरच विविध प्रमाणपत्र अभ्यासक्र म सुरू करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी केले. विद्यापीठाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात ध्वजारोहण केल्यानंतर त्यांनी सर्वांना आॅनलाइन शुभेच्छा दिल्या.
विद्यापीठातील ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगावकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण, परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक, वित्त व लेखाधिकारी एन. व्ही. कळसकर उपस्थित होते. कोविड-१९ रोगाचा प्रादुर्भाव सर्वत्र झाला असून, या आपत्कालीन परिस्थितीत काम करणारे सर्व डॉक्टर, प्राध्यापक, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. अशा परिस्थितीत रु ग्णालयात सेवा पुरविताना तांत्रिक मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या दृष्टिकोनातून विद्यापीठाचे प्रति-कुलपती तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी दिलेल्या आदेशान्वये विद्यापीठाकडून विविध प्रमाणपत्र अभ्यासक्र मास प्रारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाचे विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता डॉ. सचिन मुंब्रे, डॉ. जयंत पळसकर, डॉ. श्रीकांत देशमुख, डॉ. धनाजी बागल व वैद्यकीय तज्ज्ञांची समिती यांच्या समितीने पुढील प्रमाणपत्र अभ्यासक्र म आरेखित केले आहेत. विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्टिफिकेट कोर्स इन आॅपरेशन थेटर टेक्नॉलॉजी, सर्टिफिकेट कोर्स इन रेडिओ टेक्नॉलॉजी, सर्टिफिकेट कोर्स इपिडेमिक मॅनेजमेंट, सर्टिफिकेट कोर्स इन डायलिसिस, सर्टिफिकेट कोर्स इन ईसीजी, सर्टिफिकेट कोर्स इन कॅथलॅब हे तांत्रिक अभ्यासक्र म सुरू करण्यात येणार असून, सर्टिफिकेट कोर्स इन पंचकर्म, सर्टिफिकेट कोर्स इन आयुर्वेद नर्सिंग, सर्टिफिकेट कोर्स इन डेंटल मेकॅनिक आदी एक किंवा दोन वर्ष कालावधीचे अभ्यासक्र म सुरू करण्यात येणार आहेत, असेही कुलगुरुंनी नमूद केले.