मसगा कनिष्ठ महाविद्यालयात विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 05:48 AM2021-02-05T05:48:55+5:302021-02-05T05:48:55+5:30
महाविद्यालयीन स्तरावर निबंध स्पर्धा, घोषवाक्य तयार करणे, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. ...
महाविद्यालयीन स्तरावर निबंध स्पर्धा, घोषवाक्य तयार करणे, वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महिलांचा आदर करा असा विषय होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. दिनेश शिरुडे होते. प्रास्ताविक महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा वैशाली साळुंखे यांनी केले. प्राचार्य डॉ. डी. एफ. शिरुडे, उपप्राचार्य डॉ. सी. एम. निकम कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य दीपक सूर्यवंशी पर्यवेक्षक प्रा. रवींद्र मोरे, विशाखा समितीच्या अध्यक्षा प्रा. श्रीमती योगिता पवार आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. योगेश सावंत यांनी केले व आभार प्रा. के. डी. पवार यांनी मानले. परीक्षक म्हणून प्रा. लीना शेलार, प्रा. मिलिंद पवार यांनी काम पाहिले.