कल्याणी महिला संस्थेतर्फे विविध स्पर्धा, प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 11:25 PM2019-06-16T23:25:51+5:302019-06-17T00:05:28+5:30
कल्याणी महिला नागरी पतसंस्थेच्या वतीने कल्याणी महिला सहकारी प्रबोधनी मंच व कल्याणी क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेतर्फे महिलांसाठी वाळवण जत्रा प्रदर्शन व विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
नाशिक : कल्याणी महिला नागरी पतसंस्थेच्या वतीने कल्याणी महिला सहकारी प्रबोधनी मंच व कल्याणी क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेतर्फे महिलांसाठी वाळवण जत्रा प्रदर्शन व विविध स्पर्धा घेण्यात आल्या. नाशिकरोड येथे कलंत्री मंगल कार्यालयात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन अॅड. वर्षा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी देशमुख यांनी पतसंस्थेने महिला बचतगट व महिला उद्योजकांसाठी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून सारिका पारखी, सुरेखा पेखळे, रुपाली पर्वतीकर, नलिनी फड आदींनी काम पाहिले. यावेळी विजेत्यांना अभिनेत्री साक्षी खैरनार यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. संस्थेच्या अध्यक्ष अॅड. अंजली पाटील यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंगी गोपाळ पाटील यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन उपाध्यक्ष डॉ. ज्योती सोनवणे यांनी केले. निमा विसपुते यांनी आभार मानले.
कार्यक्रमास माधुरी बक्षी, अॅड. मीरा बोडके, काशाबाई भदरगे, सतिशा पुरोहित आदींसह पदाधिकारी, प्रतिनिधी व महिला उपस्थित होत्या.
पाणीबचतीचा संदेश देणारा सुरेश चव्हाण दिग्दशर््िात शीळपाणी लघुपट दाखविण्यात आला. तसेच महिलांसाठी कैरी पन्हे स्पर्धा, कैरीचे विविध पदार्थ बनविणे, आम्ही दोघी मैत्रिणी, उत्कृष्ट स्टॉल अशा वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या.