सारडा विद्यालयात विविध स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:16 PM2020-02-29T23:16:46+5:302020-02-29T23:17:40+5:30

सिन्नर : येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विज्ञानाने जग जवळ आले, मात्र माणसामाणसांतील संवाद संपत चालला आहे. पर्यावरणाची हानी होत आहे, भविष्यात पुढील पिढीसाठी सुयोग्य पर्यावरण हवे असेल तर प्रत्येकाने एकतरी झाड लावावे व त्याचे संवर्धन करावे, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी व डॉ. महावीर खिवंसरा यांनी केले.

Various competitions at Sarada School | सारडा विद्यालयात विविध स्पर्धा

सिन्नर येथील ब. ना. सारडा विद्यालयात विज्ञान दिनानिमित्त आयोजित स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. त्याप्रसंगी डॉ. महावीर खिवंसरा, अनिल पवार, सुनील हांडे, आसावरी बर्वे, कविता गायकवाड, स्मिता पाटोळे, वसंत पैठणकर, दत्तात्रय परदेशी आदी.

Next
ठळक मुद्देमान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन त्यांना गौरविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
विज्ञानाने जग जवळ आले, मात्र माणसामाणसांतील संवाद संपत चालला आहे. पर्यावरणाची हानी होत आहे, भविष्यात पुढील पिढीसाठी सुयोग्य पर्यावरण हवे असेल तर प्रत्येकाने एकतरी झाड लावावे व त्याचे संवर्धन करावे, असे प्रतिपादन माजी विद्यार्थी व डॉ. महावीर खिवंसरा यांनी केले.
राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य अनिल पवार, पर्यवेक्षक सुनील हांडे, आसावरी बर्वे, कविता गायकवाड, स्मिता पाटोळे, वसंत पैठणकर, दत्तात्रय परदेशी आदी उपस्थित होते.
विज्ञान दिनानिमित्त आयोजित रांगोळी स्पर्धेत ध्रुव राठोड, आशिष काळे, आशुतोष राठोड, तर विज्ञान प्रकल्प स्पर्धेत धनंजय पगार, सुमित आढाव, लकी सरोदे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन त्यांना गौरविण्यात आले.
यश बिन्नर, प्रथमेश भदाणे, अभिजित राठोड, यश गोसावी, नील गुजराथी, हर्षल संघपाळ या विद्यार्थ्यांनी विविध शास्रज्ञांची माहिती दिली.
सूत्रसंचालन प्रथमेश भालेराव यांनी केले. आभार वसंत पैठणकर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
सोड्याची बाटली मारून एकास केले जखमी
नांदगाव : येथील गणेश सुनील भिलोरे (२६), रा. रेल्वे चाळ याला संशयित आरोपी खंडू दत्तू (पूर्ण नाव नाही) याने सोड्याची बाटली मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. फिर्यादी आपला मित्र समाधान कदम यास बघायला गेला तेव्हा संशयिताने त्याच्याकडे दारू पिण्यास पैसे मागितले. ते न दिल्याचा राग येऊन त्याच्यावर हल्ला करून जखमी केले. गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास पोलीस के. जी. राऊते तपास करीत आहेत.

Web Title: Various competitions at Sarada School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.