सिन्नरला ‘तीज’ सणानिमित्त विविध स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 11:18 PM2017-08-01T23:18:58+5:302017-08-02T00:10:52+5:30
माहेश्वरी समाजात महत्त्वपूर्ण मानला जाणाºया ‘तीज’ सणानिमित्त नाशिक जिल्ह्यातील शेकडो माहेश्वरी महिला एकत्र आल्या. ‘जश्न ए सिंजारा’ या हरियाली ‘तीज’च्या कार्यक्रमात विविध स्पर्धेत महिलांनी सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला. ‘ऋतुरंग’ कार्यक्रमात भक्तिभावाबरोबरच माहेश्वरी महिलांनी स्पर्धांचा आनंद लुटला.
सिन्नर : माहेश्वरी समाजात महत्त्वपूर्ण मानला जाणाºया ‘तीज’ सणानिमित्त नाशिक जिल्ह्यातील शेकडो माहेश्वरी महिला एकत्र आल्या. ‘जश्न ए सिंजारा’ या हरियाली ‘तीज’च्या कार्यक्रमात विविध स्पर्धेत महिलांनी सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला. ‘ऋतुरंग’ कार्यक्रमात भक्तिभावाबरोबरच माहेश्वरी महिलांनी स्पर्धांचा आनंद लुटला.
नाशिक जिल्हा माहेश्वरी महिला संघटन अंतर्गत सिन्नर माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने येथील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भगवान महेशमूर्तीच्या पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. माहेश्वरी महिला संघटनेच्या राष्टÑीय उपाध्यक्ष शैला कलंत्री, राष्टÑीय कार्यालयीन
मंत्री सुषमा मुंदडा, अखिल भारतीय सुरभी समितीच्या संयोजक कांताजी राठी, जिल्हाध्यक्ष सरला मालपाणी, सचिव स्वाती बूब, सिन्नर महिला मंडळाच्या आजीवन अध्यक्ष वर्षा चांडक, संघटनमंत्री शोभा कलंत्री आदी व्यासपीठावर उपस्थित होत्या. २५ जुलै ते १० आॅगस्टपर्यंत माहेश्वरी महिला तीजनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करत असतात. यानिमित्ताने पहिल्यांदाच जिल्ह्यातील माहेश्वरी महिलांना एकत्र बोलावून सिन्नरला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातून ५६० महिला या कार्यक्रमास उपस्थित राहून विविध स्पर्धेत सहभागी झाल्या.
‘ऋतुरंग’ कार्यक्रमात माहेश्वरी महिला मंडळाची जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा पार पडली. सामुदायिक नृत्य स्पर्धेत नाशिक, ओझर, त्र्यंबकेश्वर व मालेगाव येथील महिला मंडळांनी पारितोषिके पटकावली. उत्कृष्ट वेषभूषा स्पर्धेत सिन्नरने प्रथम क्रमांक मिळविला, तर लासगावला बेस्ट कॉर्डिनेशचे पारितोषिक मिळाले. ‘सब आओ सब जीतो’ या धर्तीवर महिलांना अनेक बक्षिसे देण्यात आली. लकी ड्रॉमध्येही अनेकांना बक्षिसे वितरित करण्यात आली. दिवसभर आयोजित विविध कार्यक्रमानिमित्त जिल्ह्यातून आलेल्या महिलांसाठी चहा, अल्पोपाहार व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमात नाशिक, नाशिकरोड, भगूर, त्र्यंबकेश्वर, ओझर, मालेगाव, चांदवड, वावी, इगतपुरी, विंचूर, उगाव, निफाड, पिंपळगाव, सायखेडा या गावांसह जिल्हाभरातून महिला स्वयंस्फूतीने सहभागी झाल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिन्नर महिला मंडळाच्या आजीवन अध्यक्ष वर्षा चांडक, शोभा कलंत्री, किरण नावंदर, कांचन कासट, शशिकला कासट, ज्योती कलंत्री, सुनंदा करवा, शकुंतला जाजू, सोनल मुंदडा, शिल्पा लोया, राशी लढ्ढा, मनीषा चांडक, सीमा टावरी यांच्यासह महिला मंडळाने परिश्रम घेतले. सीमा टावरी व मनीषा चांडक यांनी सूत्रसंचालन केले. स्वागताध्यक्ष वर्षा चांडक यांनी आभार मान् ाले.