तुंगण दिगर येथे कॉँग्रेसतर्फे विविध उपक्रम

By admin | Published: June 21, 2017 12:36 AM2017-06-21T00:36:56+5:302017-06-21T00:37:11+5:30

तुंगण दिगर येथे कॉँग्रेसतर्फे विविध उपक्रम

Various enterprises by Congress at Tungan Diagar | तुंगण दिगर येथे कॉँग्रेसतर्फे विविध उपक्रम

तुंगण दिगर येथे कॉँग्रेसतर्फे विविध उपक्रम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ताहाराबाद : समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काँग्रेस पक्षाने आपली कार्यप्रणाली चालवली असून, आजवर पक्षाने समाजातील शेवटचा घटक केंद्रबिंदू मानून विविध योजना यशस्वीपणे राबवून सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी केली. यामुळेच आजही युवा वर्ग पक्षासोबत आहे. सध्याच्या भाजपाप्रणीत शासनाने काँग्रेस पक्षाच्या योजनांची नावे बदलण्या पलीकडे काही केलेले नाही. बाकी सर्व आघाडीवर भाजपा सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या महासचिव प्रतिभा रघुवंशी यांनी केला.
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘हम है राजीवऋ’ उपक्रमा अंतर्गत व काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या वाढिदवसा निमित्त विविध सामाजिक उपक्र म तुंगणदिगर व मांगीतुंगी येथे घेण्यात आले, याप्रसंगी प्रतिभा रघुवंशी बोलत होत्या. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी बागलाण तालुका काँग्रेस अध्यक्ष साखरचंद कांकरीया होते.
प्रस्ताविक धुळे लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन कोठावदे यानी केले. याप्रसंगी युवक काँग्रेस राष्ट्रीय सचिव अमित यादव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव डॉ चंद्रशेखर पाटिल, स्वप्निल पाटिल, पंचायत समिती सदस्य संजय जोपळे, सटाणा काँग्रेस शहराध्यक्ष किशोर कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल पाटिल, यांची भाषणे झाली.
कार्यक्रमास तुंगणचे सरपंच विठ्ठल चौधरी, उपसरपंच वामन गावित, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद पाटिल, परशुराम अहीरे, भिका सोनवणे, सुरेखा पगार, गोरख बागुल, येथील ग्रामस्थ उपस्थित होते.तुंगण दिगर व मांगीतुंगी येथील १०० महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. तुंगाडी नदीवर माती नालाबांध श्रमदान करून करण्यात आला. वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थी सत्कार, तसेच सटाणा येथील सई बाल रुग्णालयाचे संचालक डॉ. अमोल पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांची तपासणी केली.

Web Title: Various enterprises by Congress at Tungan Diagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.