नाशिक शहरात महिला दिनानिमित्त विविध उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 12:56 AM2018-03-06T00:56:35+5:302018-03-06T00:56:35+5:30
शहरातील विविध संस्था संघटनांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त दि.८रोजी सकाळी १० वाजता सुंदरबन कॉलनी, भुजबळ फार्म शेजारील मातृनर्सिंग होमच्यावतीने महिलांसाठी गर्भाशय मुख कॅन्सर तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
नाशिक : शहरातील विविध संस्था संघटनांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त दि.८रोजी सकाळी १० वाजता सुंदरबन कॉलनी, भुजबळ फार्म शेजारील मातृनर्सिंग होमच्यावतीने महिलांसाठी गर्भाशय मुख कॅन्सर तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहान डॉ. प्रेमराज खैरनार, डॉ.विद्या खैरनार यांनी केले आहे. जागतिक महिलादिनानिमित्त बी. के. एज्युकेशनल अॅण्ड वेल्फेअर सोसायटी अंतर्गत ५ ते ७ मार्च दरम्यान मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मधुबन कॉलनीतील अमृतगंगा गार्डनमध्ये आयोजित या शिबिरात सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान, साधना, ओमकार, असा योगाभ्यास शिकविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे किशोर येलमामे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
आम्ही साºयाजणी तर्फे परिसंवाद
आम्ही साºयाजणी या संस्थेच्यावतीने बुधवार (दि.७) दुपारी ४ वाजता गंगापूररोडवरील जुना गंगापूर नाका नजिक शंकराचार्य संकुल, येथे सोशल मिडीया एक भीषण वास्तव याला जबाबदार कोण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात ज्येष्ठ पत्रकार विश्वार देवकर, आमदार सिमा हिरे, प्रा. स्वाती पाचपांडे, पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा प्राचार्य सरिता औरंगाबादकर आदि सहभागी होणार आहेत. अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष संजिवनी कुलकर्णी यांनी दिली.
सुनहरी यादे कार्यक्रम
गुरूवार (दि.८) सकाळी १०वाजता मध्यवर्ती कारागृहात बागेश्री निर्मित सुनहरी यादे हा मराठी हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मिनाक्षी वाळवेकर,श्रया गायकवाड,मेनका सुगंधी या गायकांसह कारागृहातील काही महिला बंदीवान आपली गायन कला सादर करनार आहेत. अशी माहिती बागेश्रीचे संचालक चासदत्त दिक्षीत यांनी दिली.