यात्रोत्सवात विविध कार्यक्रमांची रेलचेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:55 PM2020-02-23T23:55:48+5:302020-02-24T00:46:55+5:30
महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये ‘अप्सरा आली’ या महाराष्टÑाची लोकधारा जोपासणाऱ्या कार्यक्रमाने मनमाडकरांना मंत्रमुग्ध केले. तकतरावपासून ते हजेरीपर्यंतच्या सादरीकरणाने यात्रोत्सवात रंगत आणली.
मनमाड : येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या करमणुकीच्या कार्यक्रमांमध्ये ‘अप्सरा आली’ या महाराष्टÑाची लोकधारा जोपासणाऱ्या कार्यक्रमाने मनमाडकरांना मंत्रमुग्ध केले. तकतरावपासून ते हजेरीपर्यंतच्या सादरीकरणाने यात्रोत्सवात रंगत आणली.
शहरात आजही पारंपरिक पद्धतीने व रितीरिवाजानुसार महाशिवरात्रीनिमित्त यात्रोत्सव साजरा करण्याची प्रथा टिकून आहे. यात्रा कमिटीचे अध्यक्ष अशोक सानप उपाध्यक्ष सतीशसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिरातील विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच गवळी वाड्यातून कावड्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी शहराच्या विविध भागातून काढण्यात आलेल्या तकतरावच्या मिरवणुकीचा समारोप गांधी चौकात करण्यात आला. दहेगाव येथील तकतरावला पहिला मान देण्याची प्रथा पूर्वीपासून सुरू आहे.यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेल्या करमणुकीच्या कार्यक्रमांत एकात्मता चौकात ‘अप्सरा आली’ या मराठी-हिंंदी नृत्यगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रंगमंचाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री गणेशवंदनेने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
या कार्यक्रमात सादर करण्यात आलेल्या मराठी लावण्यांसह हिंदी गीतांवर मनमाडकरांची पावले थिरकली. मनोरंजनाबरोबरच जनजागृतीपर विनोदी नाटिका सादर करण्यात आल्या.
सकाळी तलाठी कार्यालयासमोर हजेरीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रोत्सवाच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष सानप, उपाध्यक्ष सतीशसिंग परदेशी, रवि इपर, ईश्वर पाटील, गोटू केकाण, अनिल देवरे, अकबर सोनावाला, अनिल दराडे, भाऊ हरबा गवळी, सलीम सोनावाला, पारीख बाबूजी, ज्ञानेश्वर नागापुरे, सुनील गवळी, लाला नागरे यांच्यासह सदस्यांनी परिश्रम घेतले.