महिला बचतगटातर्फे विविध वस्तूंचे प्रदर्शन

By admin | Published: March 9, 2017 01:09 AM2017-03-09T01:09:20+5:302017-03-09T01:09:33+5:30

स्पेशलपणा जपणे म्हणजे वेगळेपण सिद्ध करणे असल्याचे प्रतिपादन निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे यांनी केले.

Various items display by women's savings groups | महिला बचतगटातर्फे विविध वस्तूंचे प्रदर्शन

महिला बचतगटातर्फे विविध वस्तूंचे प्रदर्शन

Next

 मालेगाव : निकोप कुटुंब व समाजासाठी स्त्रियांनी व पुरुषांनी एकत्र पाऊले टाकणे गरजेचे बनले आहे. प्रत्येक स्त्री ही युनिक व स्पेशल असते. तुमच्यामध्ये जे प्लस आहे ते लक्षात आले पाहिजे. स्पेशलपणा जपणे म्हणजे वेगळेपण सिद्ध करणे असल्याचे प्रतिपादन निवडणूक शाखेच्या उपजिल्हाधिकारी प्रज्ञा बढे यांनी केले.
येथील कृष्णा लॉन्स मंगल कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळावा व महिला मतदार साक्षर मेळाव्यात प्रज्ञा बढे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी होते. व्यासपीठावर प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार डॉ. सुरेश कोळी, नायब तहसीलदार गिरीश वाखारे, जगदीश निकम व विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिला उपस्थित होत्या.
उपजिल्हाधिकारी बढे पुढे म्हणाल्या की, स्त्रीने आपले वेगळेपण जपणे गरजेचे आहे. स्पेशालिटी अंगीकारून निकोप कुटुंब व समाज निर्मिती करणे गरजेचे आहे.
यावेळी अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले की, प्रत्येक ठिकाणी लढायची तयारी स्त्रियांनी ठेवणे गरजेचे आहे. लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. लोकांच्या बोलण्याकडे, प्रतिक्रियांकडे लक्ष देऊ नका. शासनाने दिलेले काम प्रामाणिकपणे पार पाडा. प्रत्येक विभागात शहर व तालुक्यातील महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी महिला कृती समितीची स्थापना करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. यावेळी माहिती सहायक मोहिनी राणे, मसगा महाविद्यालयाच्या प्रेमल देवरे, प्रा. मनीष सोनवणे, टेहरे प्राथमिक शाळेच्या शिक्षक नूतन चौधरी, काबरा विद्यालयाच्या मुख्याध्यापक माधुरी पाठक यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन पुष्पलता गाढे-पाटील यांनी केले. तत्पूर्वी मतदारांच्या जनजागृतीसाठी व महिला दिनानिमित्त ंअंगणवाडी सेविका, मदतनीस व कर्मचाऱ्यांनी फेरी काढली होती.

Web Title: Various items display by women's savings groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.