कळवण रस्त्यालगतच्या कॉलनीत विविध समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 05:09 PM2019-12-20T17:09:48+5:302019-12-20T17:10:09+5:30
देवळा : देवळा नगरपंचायत हद्दीत देवळा कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी देवळा नगरपंचायत हद्दीत देवळा कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनीरस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी येथील नागरीकांनी केली आहे.
Next
ठळक मुद्दे देवळा नगरपंचायत हद्दीत प्रभाग क्र . १६ मध्ये रामराव हौसिंग सोसायटी हि वसाहत येते. वाजगाव व कळवण रस्त्याने जाणारी वाहने शॉर्टकट म्हणून या कॉलनी रस्त्याचा प्रामुख्याने वापर करतात. तालुक्याच्या पश्चिम भागातील वाजगाव, वडाळे, खर्डा, देवळा शहराचा पश्चिम भाग, र
यामुळे दिवसभर रामराव हौसिंग वसाहतीत ट्रॅक्टर, पीक अप, बैलगाडी, रिक्शा, आदी ये जा करणार्या वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. पहाटे पाच वाजेपासून ते सायंकाळी उशीरापर्यंत दिवसभरात दिडशे ते दोनशे वाहने या रस्त्याने ये जा करतात.हया वाहनांमुळे दिवसभर सर्वत्र धुळ उडत असते. घरांमध्ये मोठ्या प्रमाणात हि धूळ येते. हि धूळ घरातील वस्तूंवर बसते. यामुळे महीला वर्ग त्रस्त झाला आहे. धुळीमुळे येथील रिहवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. धुळीमुळे अनेक नागरीकांना श्वसनाचे आजार झाले आहेत. देवळा नगरपंचायतीने ह्या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी येथील रिहवाशांनी केली आहे.