देवळालीगाव, विहितगाव, वडनेर परिसरात विविध समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 01:05 AM2019-11-19T01:05:43+5:302019-11-19T01:06:02+5:30

देवळालीगाव, विहितगाव, वडनेर प्रभाग २२ मधील विविध समस्यांबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभारी मनपा विभागीय अधिकारी राजेश पालवे यांना निवेदन देण्यात आले.

 Various problems in Deolaliigaon, Vidhgaon, Wadner area | देवळालीगाव, विहितगाव, वडनेर परिसरात विविध समस्या

देवळालीगाव, विहितगाव, वडनेर परिसरात विविध समस्या

Next

नाशिकरोड : देवळालीगाव, विहितगाव, वडनेर प्रभाग २२ मधील विविध समस्यांबाबत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रभारी मनपा विभागीय अधिकारी राजेश पालवे यांना निवेदन देण्यात आले.
मनसेच्या वतीने पालवे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग २२ मध्ये शहरी भागासोबत ग्रामीण व मळे परिसर तसेच झोपडपट्टी परिसर समाविष्ट आहे. रोकोडोबावाडी येथील नवीन पुलाची दुरवस्था झाली असून, गावठाण भागातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे काम रखडले आहे. पुलाची दुरवस्था झालेली आहे. डोबी मळा, रोकोडोबावाडी व लष्कराच्या हद्दीजवळील पथदीप बंद अवस्थेत असल्याने परिसरात सायंकाळनंतर अंधाराचे साम्राज्य पसरते.
दिवंगत साहित्यिक बाबुराव बागुल यांचे स्मारक बनविण्यात यावे, रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावे व सर्व ठिकाणचे पथदीप सुरू करावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
निवेदनावर मनसे विभाग अध्यक्ष विक्रम कदम, मनसे कामगार सेना उपसरचिटणीस प्रकाश कोरडे, उपजिल्हाप्रमुख संतोष सहाणे, नितीन धानापुणे, प्रमोद साखरे, दत्ता कोठुळे, शिवाजी जाधव, विनायक पगारे, उमेश भोई, बाजीराव मते, अमर जमधडे, शशी चौधरी, सागर दाणी, रोहन देशपांडे, नितीन पंडीत, संतोष पिल्ले आदींच्या सह्या आहेत.
वालदेवी नदीपात्रात ठिकठिकाणी गटारी व नाल्याचे सांडपाणी मिसळत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, डासांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

Web Title:  Various problems in Deolaliigaon, Vidhgaon, Wadner area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.