हरिनाम सप्ताहाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:41 AM2018-12-27T00:41:49+5:302018-12-27T00:42:09+5:30

देवळाली गावातील श्री दंडे हनुमान मंदिरात भरणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या यंदाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सप्ताह साजरा करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

Various programs on the anniversary of the anniversary of Hari Nainam Week | हरिनाम सप्ताहाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

हरिनाम सप्ताहाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम

Next

नाशिकरोड : देवळाली गावातील श्री दंडे हनुमान मंदिरात भरणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या यंदाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सप्ताह साजरा करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी अखंड हरिनाम सप्ताह अमृत महोत्सव समिती अध्यक्षपदी माजी मंत्री बबनराव घोलप यांची निवड करण्यात आली.  देवळाली गावातील श्री दंडे हनुमान मंदिरात स्व. गबाजीबाबा गायकवाड यांनी हरिनाम सप्ताहास सुरुवात केली. श्री निवृत्तिनाथ सत्संग सेवा मंडळ, पंचकमिटी व श्री शनैश्वर मित्रमंडळाच्या वतीने गेल्या ७४ वर्षांपासून सप्ताह भरविण्यात येत आहे. यानिमित्त श्री दंडे हनुमान मंदिरात बैठक पार पडली. बैठकीला प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री बबनराव घोलप, त्र्यंबकराव गायकवाड, निवृत्तिनाथ महाराज गोतिसे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, निवृत्ती अरिंगळे, सुधाकर जाधव, केशव पोरजे, श्याम खोले, वासुदेव गायकवाड, शिरीष लवटे आदी मान्यवर उपस्थित होते.  पुढील रूपरेषा व विविध समित्या स्थापन करण्यासाठी रविवारी (दि.३०) बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी भव्य प्रमाणात होणाºया अखंड हरिनाम सप्ताहासाठी अनेकांनी देणग्यांची घोषणादेखील केली.
बैठकीला सुनील गाडेकर, ज्ञानेश्वर गायकवाड, रामभाऊ जगताप, रघुनाथ व्यवहारे, अरुण आहेर, मीराबाई कदम, मुकुंद गायकवाड, निवृत्ती सातभाई, प्रवीण पाटील, राजेंद्र गायकवाड, कैलास चव्हाण, बबननाना पुजारी आदी उपस्थित होते.

Web Title: Various programs on the anniversary of the anniversary of Hari Nainam Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.