बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 12:55 AM2018-05-01T00:55:05+5:302018-05-01T00:55:05+5:30

भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे वसंतस्मृती कार्यालयात बुद्ध जयंती प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरी झाली. व्यासपीठावर रोहिणी नायडू, सुजाता करजगीकर, संजय गालफाडे, उत्तम उगले, नगरसेवक प्रा. शरद मोरे, अ‍ॅड. श्याम बडोदे, शशांक हिरे, शिवाजी गांगुर्डे, नामदेव हिरे, सुरेश बर्वे आदी होते.

Various programs for Buddha Purnima | बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

बुद्ध पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम

Next

नाशिक : भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चातर्फे वसंतस्मृती कार्यालयात बुद्ध जयंती प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरी झाली. व्यासपीठावर रोहिणी नायडू, सुजाता करजगीकर, संजय गालफाडे, उत्तम उगले, नगरसेवक प्रा. शरद मोरे, अ‍ॅड. श्याम बडोदे, शशांक हिरे, शिवाजी गांगुर्डे, नामदेव हिरे, सुरेश बर्वे आदी होते. याप्रसंगी लक्ष्मण सावजी यांनी मनोगत व्यक्त केले. इतर मान्यवरांनी आपल्या भाषणांमधून गौतम बुद्धांच्या जीवनावर प्रकाश टाकला. प्रारंभी गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर बुद्धवंदना म्हणण्यात आली.  यावेळी राजू मोरे, कुंदन खरे, उज्ज्वला हिरे, जया वाघ, मदन निकम, संजय क्षीरसागर, रमेश गवाल, ऋ षीकेश आहेर, बापू लोखंडे, विजय पगार, अरुण शेंदूर्णीकर, विजय चव्हाण, किरण पगारे, प्रियदर्शन टांकसाळे, नितीन कार्ले, जयंत वैद्य, विजय कुलकर्णी, बापू सपकाळे, सुरेश साठे, दिलीप बंदरे आदी उपस्थित होते. आदींसह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
आंबेडकर फाउंडेशनच्या वतीने बुद्धवंदना  भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त भारत प्रतिभूती मुद्रणालयासमोर सकाळी बुद्धवंदना व अभिवादन करण्यात आले. दुपारी खीरदान कार्यक्र म झाला. यावेळी डॉ. डी. के. रथ, ज्ञानेश्वर जुंद्रे, माजी सचिव रामभाऊ जगताप, सुधीर गायकवाड, राहुल रामराजे, सल्लागार प्रकाश सोनवणे, अनिल थोरात, मुकुंद पवार, कार्याध्यक्ष श्रीकांत जाधव, सचिव ताराचंद मोरे खजिनदार आसिफ पठाण आदी कामदार वर्ग उपस्थित होता.
पेठे विद्यालयात  बुद्ध पौर्णिमा साजरी
पेठे विद्यालयात बुद्ध पौर्णिमा उत्साहात पार पडली. याप्रसंगी गौतम बुद्धांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक लक्ष्मण जाधव होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक एकनाथ कडाळे, पर्यवेक्षिका कुंदा जोशी, शिक्षक प्रतिनिधी शशांक मदाने आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक जाधव यांनी आपल्या मनोगतातून बुद्धांच्या तत्त्वज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

Web Title: Various programs for Buddha Purnima

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.