शाळांमध्ये बालदिनानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 12:57 AM2019-11-16T00:57:07+5:302019-11-16T00:57:28+5:30
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक शाळांमध्ये वेशभूषा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
नाशिक : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील अनेक शाळांमध्ये वेशभूषा स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. विविध सामाजिक संस्था संघटनाच्या वतीनेही पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
के. के. वाघ इंग्लिश स्कूल डीजीपीनगर येथे बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेत विविध गीते, नृत्य, खेळ सादर करण्यात आलो. यात विद्यार्थ्यांनी बालगीतांचे समूह गायन केले. यावेळी मुख्याध्यापक चित्रा नरवाडे, सना शेख, रविना पवार आदी उपस्थित होते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती राष्ट्रवादी भवन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी दिंडोरी लोकसभेचे अध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी आपल्या मनोगत व्यक्त केले. नेहरू यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या विकासाचा खरा पाया रचला गेला. त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी भारताची अर्थव्यवस्था सक्षम बनविण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले व या निर्णयांमुळेच भारत प्रगतिपथावर वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी नाशिक लोकसभा अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, अनिता भामरे, अंबादास खैरे, गौरव वाघ, चंद्रकांत साडे, मनोहर बोराडे, अॅड.चिन्मय गाढे, नीलेश सानप, डॉ.संदीप चव्हाण, रेहान शेख उपस्थित होते.
पुष्पा हिरे प्राथमिक विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपशिक्षक खैरनार हे होते. यावेळी मुख्याध्यापक त्रिभुवन यांनी नेहरु ंच्या जीवनाविषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी गायन व नृत्य सादर केले. सूत्रसंचालन उपशिक्षक सी. आर. हिरे यांनी, तर आभार देसले यांनी मानले.
महापालिकेत पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण
महानगरपालिकेच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शालिमार चौक येथील नेहरू उद्यानातील पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संदीप नलावडे, गटनेते शाहू खैरे, गजानन शेलार, दीक्षा लोंढे, नगरसेविका वत्सला खैरे, उपायुक्त अर्चना तांबे, सहायक आयुक्त जयश्री सोनवणे, विभागीय अधिकारी हेमंत पाटील, उद्यान निरीक्षक रमेश भालेराव, जनसंपर्क अधिकारी नितीन गंभिरे, संतोष कान्हे आदी उपस्थित होते.