संविधान दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 12:28 AM2018-11-27T00:28:39+5:302018-11-27T00:28:43+5:30

संविधान दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शाळांमध्येदेखील कार्यक्रम घेण्यात आले. नाशिकरोड परिसरात शासकीय कार्यालय, मुद्रणालय आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाच्या प्रास्ताविकांचे वाचन करण्यात आले.

Various programs in the city during the constitution day | संविधान दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम

संविधान दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम

Next

नाशिक : संविधान दिनानिमित्त शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शाळांमध्येदेखील कार्यक्रम घेण्यात आले. नाशिकरोड परिसरात शासकीय कार्यालय, मुद्रणालय आदी ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधानाच्या प्रास्ताविकांचे वाचन करण्यात आले.  पंचवटी हिरावाडीतील (कमलनगर) येथील जेम्स इंग्लिश मीडियम शाळेत भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला. संविधानाच्या मूल्यांचे रक्षण करणे आपले कर्तव्य असल्याचे प्रतिपादन संस्थेच्या अध्यक्षा हिमगौरी अहेर-आडके यांनी केले. विद्यार्थांसाठी आमचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य या विषयावर निबंधलेखन व प्रश्नमंजूषा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.  यावेळी शिक्षकांनी भारताचे संविधान विद्यार्थ्यांना वाचून दाखवले व संविधानाचे हक्क, कर्तव्य यांची ओळख करून दिली. कार्यक्र माला शैक्षणिक सल्लागार अनुराधा जैस्वाल, मंजुशा बर्वे, रमा जाधव, वैशाली तंगार आदींसह विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
धनलक्ष्मी शाळा
मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था संचलित धनलक्ष्मी बालविद्यामंदिर व प्राथमिक शाळेत भारताचा संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कोल्हे, सचिव ज्योती कोल्हे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले. याप्रसंगी सर्वप्रथम विद्यार्थ्यांना भारताच्या संविधानाची ओळख करून देण्यात आली. राज्यघटनेचा आदर करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक प्रकाश कोल्हे यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालय
विभागीय आयुक्त कार्यालयात सोमवारी संविधान दिनानिमित्त विभागीय आयुक्त राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले. यावेळी अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील, उपायुक्त रघुनाथ गावंडे, सुखदेव बनकर, अर्जुन चिखले, प्रवीण पुरी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
व्यंकटराव हिरे महाविद्यालय
४महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर यांनी मार्गदर्शन केले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. कुणाल वाघ यांनी उपस्थितांना संविधान शपथ दिली. याप्रसंगी प्रा. डॉ. नारायण गाढे, डॉ. यू. पी. शिंदे, गोविंदराव देशमुख, विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बिंदू रामराव देशमुख महाविद्यालय
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या बिंदू रामराव देशमुख महाविद्यालयात भारतीय संविधान साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. लिना पांढरे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच संविधान प्रतीचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक संजय कीर्तने यांनी केले. याप्रसंगी प्रा. चंद्रकांत गोसावी यांनी संविधानाच्या सरनाम्याचे वाचन केले. याप्रसंगी प्रा. डॉ. मीनल बर्वे, प्रा. स्मिता साळवे, प्रा. राजू सानप, प्रा. डॉ. लता पवार, प्रा. तेजेश बेलदार, भाऊराव चव्हाण, राजश्री ठोंबरे, स्मिता जाधव, भिका शेळके, योगेश देशपांडे आदी उपस्थित होते.
उंटवाडी माध्यमिक विद्यालय
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक विद्यालय उंटवाडी येथे संविधान दिन मुख्याध्यापक रत्नप्रभा सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी उपमुख्याध्यापिका प्रियंका निकम यांनी संविधान दिनानिमित्त संविधानाचे सामूहिक वाचन केले. सुनंदा कुलकर्णी यांनी संविधान दिनाची माहिती सांगितली. याप्रसंगी २६ नोव्हेंबर रोजी आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अशोक कोठावदे, पर्यवेक्षक मधुकर पगारे, शिक्षक प्रतिनिधी दिलीप पवार, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Various programs in the city during the constitution day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.