सातपूर येथे गुरूपौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:16 AM2018-07-28T00:16:16+5:302018-07-28T00:16:48+5:30
अशोकनगर येथील मॉडर्न एज्युकेशन विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे पदाधिकारी डॉ. झुंबर भंदुरे, किसनराव विधाते उपस्थित होते. मुख्याध्यापक संगीता कासारे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले.
सातपूर: अशोकनगर येथील मॉडर्न एज्युकेशन विद्यालयात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे पदाधिकारी डॉ. झुंबर भंदुरे, किसनराव विधाते उपस्थित होते. मुख्याध्यापक संगीता कासारे यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी गुरुवंदना नृत्य सादर केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. सूत्रसंचालन श्रद्धा चिंचोरे व मीनाक्षी सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन मनीषा पाटील, ज्योती सैंदाणे, वर्षा तिवारी, योगीता बागुल या विद्यार्थिनींनी केले.
प्रगती विद्यालय
अशोकनगर येथील प्रगती माध्यमिक विद्यालयात महात्मा फुले मागासवर्गीय संस्थेच्या वतीने गुरु पौर्णिमा साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब वाणी, कुंदा बधान उपस्थित होते. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मुख्याध्यापक राहुल चव्हाण, सविता कोठावदे यांनी गुरु पौर्णिमेचे महत्त्व विशद केले. याप्रसंगी सुभाष काळे, जे.टी. येवला,रेखा साबळे, मनीषा सोनवणे, भारती बधान, योगेश जाधव, आकाश मदने आदींसह पालक उपस्थित होते.
मनपा शाळा क्र मांक २८
सातपूर कॉलनीतील मनपा शाळा क्र मांक २८ मध्ये गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सोनजी गवळी होते. विद्यार्थ्यांनी गुरु जनांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला. गणेश आहिरे, देवेंद्र पाटील, वैभव माळी, प्रियंका पाटील, सना पिंजारी, ओम गोरडे आदींनी गुरुची महती सांगितली. आठवीचे विद्यार्थी आदित्य गवळी, करण चव्हाण, रोहन जाधव यांनी तंबाखूचे व्यसन व दुष्परिणाम यावर आधारित नाटिका सादर केली. सूत्रसंचालन प्रेरणा चौधरी, रसिका खांदारे या मुलांनी केले. यावेळी सोनजी गवळी, सुरेश खांडबहाले, यशवंत जाधव आदी उपस्थित होते.