सोग्रस येथील श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:09 AM2018-02-11T00:09:07+5:302018-02-11T00:41:43+5:30
चांदवड : शिवलीलामृत ग्रंथपारायण, अभिषेक, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन महाशिवरात्री उत्सवानिमित्त करण्यात आले आहे.
चांदवड : चांदवड तालुक्यातील सोग्रस येथील श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात रविवार, दि. ११ ते बुधवार, दि. १४ या कालावधीत शिवलीलामृत ग्रंथपारायण, अभिषेक, कीर्तन, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन महाशिवरात्री उत्सवानिमित्त करण्यात आले आहे. रविवारी सकाळी सात वाजता कलशपूजन, वीणापूजन तर रात्री आठ वाजता भागवताचार्य दीपिकाताई देवळीकर यांचे कीर्तन, सोमवारी रात्री वैशाली नाणेगावकर यांचे कीर्तन, मंगळवारी रामायणाचार्य रामकृष्ण महाराज सानप सत्यगावकर यांचे कीर्तन, महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल. कार्यक्रमाचे संयोजन राजाराम शिंदे, केदू गांगुर्डे, संतोष गांगुर्डे, राजाराम गांगुर्डे, सुभाष गांगुर्डे, दीपक गांगुर्डे, महेंद्र गांगुर्डे यांनी केले. असून, कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवभक्त बाबाजी महाराज गांगुर्डे, अशोक महाराज सोग्रसकर यांनी केले आहे.