परशुराम जयंतीनिमित्ताने आज विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:53 AM2018-04-18T00:53:54+5:302018-04-18T00:53:54+5:30

नाशिक : भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात विविध कार्यक्रम बुधवारी (दि. १८) आयोजित करण्यात आले असून, सायंकाळी सातपूर तसेच नाशिक शहरात भद्रकाली मंदिर येथून मिरवणूका काढण्यात येणार आहे.

Various programs on Parshuram Jayanti celebrations today | परशुराम जयंतीनिमित्ताने आज विविध कार्यक्रम

परशुराम जयंतीनिमित्ताने आज विविध कार्यक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देशहरात भद्रकाली मंदिर येथून मिरवणूका सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनेदेखील प्रथमच परशुराम जयंती साजरी केली जाणार

नाशिक : भगवान परशुराम यांच्या जयंतीनिमित्ताने शहरात विविध कार्यक्रम बुधवारी (दि. १८) आयोजित करण्यात आले असून, सायंकाळी सातपूर तसेच नाशिक शहरात भद्रकाली मंदिर येथून मिरवणूका काढण्यात येणार आहे.
परशुराम जयंती उत्सव समितीच्या वतीने सकाळी ९ वाजता इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे परशुराम जयंती साजरी करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १०. ३० वाजता शुक्ल माध्यंदिन ब्राह्मण संस्थेच्या वतीने पंचवटीतील यजुर्वेद मंदिरात कार्यक्रम होणार आहे, तर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनेदेखील प्रथमच परशुराम जयंती साजरी केली जाणार आहे. अ‍ॅड. भालचंद्र शौचे यांनी यासंदर्भात प्रथमच सूचना केली होती ती सावानाने मान्य केली. प. सा. नाट्यगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारावर सकाळी ११ वाजता होणाऱ्या कार्यक्रमास अर्थतज्ज्ञ विनायक गोविलकर उपस्थित राहणार आहेत. दुपारी १२ वाजता छन्नाद ब्राह्मण संस्थेच्या वतीने बालाजी मंदिरात जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. सातपूर विभागातील अशोकनगर येथील सावरकरनगरात दुपारी ४ वाजता परशुराम जयंतीनिमित्ताने मिरवणूक काढण्यात येणार आहे, तर सायंकाळी साडेपाच वाजता भद्रकाली मंदिरापासून मिरवणूक काढण्यात येणार आहे.

Web Title: Various programs on Parshuram Jayanti celebrations today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.