इगतपुरीत रेझिंग डेनिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 10:34 PM2020-01-05T22:34:20+5:302020-01-05T22:37:46+5:30
विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते. मात्र असे अवघड विषय बालमनावर बिंबवण्यासाठी विविध क्र ीडा स्पर्धा आवश्यक आहेत, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी केले.
इगतपुरी : विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण होते. मात्र असे अवघड विषय बालमनावर बिंबवण्यासाठी विविध क्र ीडा स्पर्धा आवश्यक आहेत, असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक अशोक रत्नपारखी यांनी केले.
इगतपुरी पोलीस ठाण्यातर्फेपोलीस रेझिंग डेनिमित्ताने कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालय झालेल्या
कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. महात्मा गांधी विद्यालयातही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी विविध क्र ीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कबड्डी, चमचा लिंबू, गोळा फेक, लांब उडी, खो-खो आदी स्पर्धा घेण्यात आल्या. मान्यवरांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. पोलीस ठाण्यातर्फेशालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. याप्रसंगी व डॉ. विजयसिंह पाटील यांनी मार्गदर्शन केले. रामोळे हॉस्पिटलच्या वतीने पोलीस कर्मचाऱ्यांचीी मोफत डोळे तपासणी करण्यात आली. डॉ. अभिजित रामोळे, डॉ. राम गिरासे, अशपाक शेख, विलास ठाकरे, भूषण वाणी, शैलेश चौधरी, दीपाली झनकर आदींनी सहकार्य केले.
हेल्मेटचा फायदा आणि सक्ती, सीटबेल्टमुळे होणारे फायदे, ट्रिपल सीटचे तोटे, मोटार अपघात आदी विषयांवर पोलिसांनी मार्गदर्शन केले. इगतपुरी पोलीस स्टेशन व जनसेवा प्रतिष्ठान, वोक्हार्ट हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रेझिंग डेनिमित्त आयोजित हृदयरोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचा १६०
पोलीस कर्मचाऱ्यांनी लाभ घेतला.