भगूर येथे सावरकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:33 AM2018-05-29T00:33:18+5:302018-05-29T00:33:18+5:30

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर याची जयंती भगूर गावामध्ये विविध उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी दिवसभर सावरकरप्रेमींनी सावरकर स्मारकात पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.

 Various programs for Savarkar Jayanti at Bhagur | भगूर येथे सावरकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम

भगूर येथे सावरकर जयंतीनिमित्त विविध उपक्रम

Next

भगूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर याची जयंती भगूर गावामध्ये विविध उपक्रमांद्वारे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोमवारी दिवसभर सावरकरप्रेमींनी सावरकर स्मारकात पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती.
सावरकर जयंतीनिमित्त सोमवारी सकाळी ७ वाजता सावरकर स्मारकात पुरातन विभागाचे संचालक विलास वाहाणे, तंत्रसहायक जया वाहाणे, जतन सहायक, बालराव पांडे, उप अवेक्षक विजय धुमाळ, व्यवस्थापक सचिन कुलकर्णी, शरद चौधरी यांनी पुतळ्याची विधीवत पुजा केली. महाराष्ट्र नवनिर्माण व विद्यार्थी सेनेच्या वतीने डॉ. प्रदीप पवार, अशोक मुर्तडक, राहुल ढिकले, रतनकुमार इचम, सुमित चव्हाण, कैलास भोर, श्याम देशमुख आदींनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी स्मारकात दर्शन घेऊन पूजन केले. भगूर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष अनिता करंजकर, उपनगराध्यक्ष प्रतिभा घुमरे, नगरसेवक दीपक बलकवडे, पंकज कलंत्री, सुरेश वालझाडे, जयश्री देशमुख, कविता यादव, अनिता ढगे, अश्विनी साळवे आदीनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाचे वतीने सावरकरप्रेमींना भगूर दर्शन अभ्यास उपक्रमाद्वारे सावरकरांचे भगूरमधील वास्तव्य, माहिती, बालपण, मित्रांची माहिती देण्यासाठी सावरकर स्मारक, लक्ष्मी नारायण मंदिर, राममंदिर, शाळा, खंडेराव मंदिरातील अष्टभुजा देवी आदीची माहिती मनोज कुवर, नीलेश हासे, प्रमोद आंबेकर, प्रशांत लोया, योगेश बुरके, पवन आंबेकर यांनी दिली.
विविध मंडळ
बारा बलुतेदार अठरा पगडजाती संघटना प्रेस कामगार मंडळ, जेष्ठ नागरिक संघ, आठवडे बाजार मित्रमंडळ, भाजपा, शिवसेना आदींनी सावरकर स्मारकात पुतळ्याचे पूजन केले. यावेळी दादासाहेब देशमुख, अंबादास कस्तुरे, मृत्युंजय कापसे एकनाथ शेटे, विलास भवार उपस्थित होते.  सावरकर जयंती उत्सव समितीच्या वतीने शिवाजी चौकात डॉ. किरण वाटारे यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर गायक मंगेश चव्हाण व सहकारी कलाकारांच्या पथकाने समूहनृत्य व गीत सादर केले. यावेळी अभिनेता नागेश मोरवेकर, धनश्री दळवी, जयंती उत्सव अध्यक्ष तानाजी करंजकर, पोलीस निरीक्षक शेखर बागडे, मुकुंद देशमुख, रमेश पवार, प्रताप पवार, प्रशांत कापसे आदी उपस्थित होते.
नाशिकरोड परिसरात प्रतिमापूजन
नाशिकरोड परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी व मित्रमेळा परिवारतर्फे सावरकरांच्या प्रतिमेचे पूजन प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेविका सुमन सातभाई, राजेंद्र ताजणे, भाजयुमो मोर्चा अध्यक्ष शांताराम घंटे आदींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नंदू हांडे, सुभाष घिया, रमेश पाळदे, शंकर साडे, दत्ता आगळे, भाईजान चव्हाण, संदीप निकम, देवेंद्र भोळे, जगन टिळे, अरूण सातभाई, जगन्नाथ सरोदे, पप्पू निकम, सुरेश शखेरे, आमोल चोपडे, अरूण निरगुडे, दौलत शिंदे, नामदेव टिळे, किशोर कानडे आदी उपस्थित होते. सिन्नरफाटा येथील पत्रकारयोगी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर अंबादास शिंदे, सतीश बागुल, ग्रंथपाल कल्पना वराडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Web Title:  Various programs for Savarkar Jayanti at Bhagur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.