वणीच्या श्रीराम मठात विविध धार्मिक कार्यक्र म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2019 11:56 PM2019-04-03T23:56:23+5:302019-04-03T23:57:16+5:30
वणी : समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य श्री उदासी यांनी येथे स्थापन केलेल्या श्रीराम मठात रामजन्मोत्सवाची लगबग सुरू आहे. दि. १० ते १७ एप्रिल म्हणजेच चैत्र शुद्ध पंचमी ते चैत्र शुद्ध द्वादशी या कलावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. किर्तन, पालखी सोहळा रथमहोत्सवाचा समावेश आहे.
वणी येथील श्रीराम मंदिरात रामजन्मोत्सवानिमित्त करण्यात आलेली सजावट.
वणी : समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य श्री उदासी यांनी येथे स्थापन केलेल्या श्रीराम मठात रामजन्मोत्सवाची लगबग सुरू आहे. दि. १० ते १७ एप्रिल म्हणजेच चैत्र शुद्ध पंचमी ते चैत्र शुद्ध द्वादशी या कलावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. किर्तन, पालखी सोहळा रथमहोत्सवाचा समावेश आहे. बुधवारी (दि. १०) निवृत्ती महाराज रायते खडकमाळेगाव, गुरुवारी (दि.११) निवृती महाराज चव्हाण ठाणगाव, शुक्रवारी (दि.१२) जगन्नाथ महाराज पाटील आसनगाव भिवंडी यांचे कीर्तन होणार आहे. शनिवारी (दि.१३) मधुकर महाराज जाधव यांचे राम जन्मोत्सवावर कीर्तन होणार आहे. रविवारी (दि. १४) समाधान महाराज महाजन रिंगणगाव, सोमवारी (दि. १५) नरेंद्र महाराज गुरव, तर मंगळवारी (दि.१६) ज्ञानेश्वर महाराज पाळधीकर, पुरु षोतम महाराज घुमरे जानोरी, अरु ण महाराज जामठीकर मुक्ताईनगर यांचे कीर्तन होणार आहे. रविवारी (दि. १४) दुपारी ४ ते ६ यावेळेत पालखी सोहळा होणार आहे. कार्यक्रमांचा पंचक्रोशीतील भक्तांनी व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मठाधिपती रामचंद्र चंद्रात्रे यांनी केले आहे.