तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध योजना : जनवीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 12:11 AM2019-07-23T00:11:02+5:302019-07-23T00:11:20+5:30
महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीजपुरवठा आणि सर्वोत्तम सेवा देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून उपकेंद्रे, रोहित्रे व वितरण यंत्रणा उभारण्यात येत आहे.
नाशिक : महावितरणच्या नाशिक परिमंडळामध्ये ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीजपुरवठा आणि सर्वोत्तम सेवा देण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून उपकेंद्रे, रोहित्रे व वितरण यंत्रणा उभारण्यात येत आहे. सोबतच ग्राहकाभिमुख सेवा ज्यामध्ये इंटरनेट व तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाइल अॅप व इतर माध्यमांतून ग्राहकांना अखंडित, गतिमान व दर्जेदार ग्राहक सेवेसाठी महावितरण नेहमीच तत्पर असल्याचे प्रतिपादन महावितरणच्या नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता ब्रिजपाल सिंह जनवीर यांनी केले.
सोमवारी (२२) नाशिकरोड येथील विद्युत भवनातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी महावितरणने राबविलेल्या उच्चदाब वितरणप्रणाली योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना, सौर कृषिपंप योजना, सौर कृषी वाहिनी योजना, मोबाइल अॅप, डिजिटल वॉलेट, सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना लॉटरी पद्धतीने कामाचे वाटप, ग्राम विद्युत व्यवस्थापक अशा विविध योजना आणि विकासकामांची प्रगती व सविस्तर माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी नाशिक शहर मंडळ अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली, पायाभूत विभागाचे अधीक्षक अभियंता संजय खंदारे, नाशिक शहर विभाग कार्यकारी अभियंता धनंजय दीक्षित, अनिल थोरात, ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता मनीष ठाकरे, परिमंडळाचे कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, उपविधी अधिकारी प्रशांत लहाने व जनसंपर्क अधिकारी विकास आढे आदी उपस्थित होते.