त्र्यंबकेश्वरी भरला वारकऱ्यांचा मेळा

By admin | Published: February 3, 2016 09:33 PM2016-02-03T21:33:16+5:302016-02-03T21:33:53+5:30

संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज यात्रोत्सव : लाखो भाविक दाखल

Varkaris rally full of Trimbakeshwari | त्र्यंबकेश्वरी भरला वारकऱ्यांचा मेळा

त्र्यंबकेश्वरी भरला वारकऱ्यांचा मेळा

Next

 त्र्यंबकेश्वर : हरिनाम आणि टाळ-मृदंगाचा गजर करीत लाखो वारकरी बुधवारी त्र्यंबकेश्वर नगरीत दाखल झाले असून, प्रत्येकालाच संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या
दर्शनाची आस लागली आहे. यात्रोत्सवानिमित्त येथे राज्यातूनच नव्हे तर परदेशातूनही भाविक दाखल झाले आहेत.
आज पौष वद्य दशमीनिमित्त शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून येथे अनेक दिंड्या विसावल्या आहेत. दिंड्या येण्यापूर्वी आपआपल्या फडावर दिंड्यांचे मंडप उभारले गेले आहेत. कीर्तन-प्रवचनासाठी ध्वनिक्षेपकांचीही सोय करण्यात आली आहे. सायंकाळी अनेक ठिकाणी प्रवचन-कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण रस्त्याने पायी जाणाऱ्या दिंड्यांमधून निवृत्ती.. नामदेव.. सोपान.. मुक्ताबाई.. एकनाथ.. नामदेव.. तुकारामांचा जयघोष ऐकू येत होता. सायंकाळपर्यंत दूरदूरच्या दिंड्या त्र्यंबकेश्वरला पोहोचल्या. विशेष म्हणजे, कृष्णा माउलींच्या दिंडीत सुमारे २५०० भाविक असून, अत्यंत शिस्तबद्ध अशी ही दिंडी आहे. दिंड्यांतील वारकरी महिला-पुरुषांमध्ये जसजसे त्र्यंबकेश्वर जवळ येईल तसतसा उत्साह संचारतो. त्र्यंबकेश्वरला आल्यावर सर्वप्रथम त्र्यंबकेश्वर मंदिरात भगवान त्र्यंबकराजाचे दर्शन घेऊन एकादशीच्या दिवशी पहाटेच ब्रह्मगिरी परिक्रमेला जाऊन दुपारपर्यंत आपआपल्या दिंड्यांच्या फडावर परत येतात. सर्व वातावरण भक्तिभावाने फुलून गेले आहे. त्र्यंबक नगरपालिकेने यात्रोत्सवाची तयारी पूर्ण केली असून, यात्रेकरिता शहर सज्ज झाले आहे. सर्व नगरसेवक, नागरिक तयारीत गुंतले आहेत. (वार्ताहर)

 

Web Title: Varkaris rally full of Trimbakeshwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.