वरखेडा आरोग्य केंद्राची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 11:29 PM2020-02-23T23:29:18+5:302020-02-24T00:50:00+5:30
वरखेडा येथील आरोग्य उपकेंद्राची दुरवस्था झाली असून, संबंधित विभाग दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. दरम्यान या ठिकाणी संबंधितांकडून सौर ऊर्जाचे थातूर-मातूर काम करण्यात आले असून, सौर ऊर्जेचे युनिट चक्क कम्पाउण्डमध्ये जकिनीवर लावण्यात आले आहे. त्याबद्दल ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
दिंडोरी : तालुक्यातील वरखेडा येथील आरोग्य उपकेंद्राची दुरवस्था झाली असून, संबंधित विभाग दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. दरम्यान या ठिकाणी संबंधितांकडून सौर ऊर्जाचे थातूर-मातूर काम करण्यात आले असून, सौर ऊर्जेचे युनिट चक्क कम्पाउण्डमध्ये जकिनीवर लावण्यात आले आहे. त्याबद्दल ग्रामस्थ आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
राज्य शासन आरोग्य विभागासाठी अनेक योजना राबवित असेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे असताना वरखेडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात आला आहे. मात्र तो योजनेचा फार्स असल्याचे बोलले जात आहे. सदर आरोग्य उपकेंद्राच्या छताला गळती लागली असून, आवारातील संरक्षक भिंतीची पडझड झाली आहे. शौचालयाची दुरवस्था झाली आहे. या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देऊन आलेला निधी खर्च करणे गरजेचे असताना संबंधित विभाग व लोकप्रतिनिधी या समस्येकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र दिसत आहे. सर्वसामान्य नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा देणे व विविध घटकांसाठीच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, योजनांचा त्यांना लाभ घेता यावा, यासाठी विविध माध्यमातून जनजागृती सुरू असते. आरोग्य विभागाच्या योजना आणि त्यांची अंमलबजावणीची करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असते. परंतु वरखेडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या छताला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सोयीसुविधा पुरविणे गरजेचे असताना, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.