वरखेडा-कादवा रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 06:38 PM2019-07-25T18:38:50+5:302019-07-25T18:39:07+5:30
दिंडोरी तालुक्यातील वरखेडा ते कादवा सहकारी साखर कारखाना या रस्त्याची चाळण झाली असून, हा रस्ता त्वरित दुरु स्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील वरखेडा ते कादवा सहकारी साखर कारखाना या रस्त्याची चाळण झाली असून, हा रस्ता त्वरित दुरु स्त करण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
कादवा ते मातेरेवाडी या दळवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडलेले आहे. सर्व रस्ते खड्ड्यांमध्ये हरवून गेले आहेत. रस्त्यावर सतत वाहतुकीची वर्दळ असते. परंतु या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांना वाहने चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते. एवढे असूनही शासनाला या रस्त्याकडे लक्ष देण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येत आहे. तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने हे रस्ते महत्त्वपूर्ण आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाची वाहतूक याच रस्त्यावरून होत असते. या रस्त्याची दयनीय स्थितीमुळे शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत नेण्यास विलंब होत असतो. परिणामी त्याचा फटका बसत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करणाºया प्रवाशांची अक्षरश: हाडे खिळखिळी होत आहेत. या रस्त्याचे कामे होऊन जास्त कालावधी लोटलेला नाही. एवढा कालावधी उलटूनही किरकोळ डागडुजीवगळता काहीही कामे करण्यात आलेली नाहीत. रस्त्याच्या या दुरवस्थेचा सर्वाधिक फटका जनतेला पावसाळ्यात बसत असतो. रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते. त्यामुळे वाहने घसरून अपघात होण्याचा धोका वाढतो. परंतु याकडे लक्ष देण्यासाठी शासनाला वेळ आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. सर्वांगीण विकास साधण्यासाठी रस्त्याचा विकास महत्त्वाचा आहे. रस्त्यांचा विकास झाला म्हणजे दळणवळण वाढेल परिणामी परिसराचा विकास होईल, हे दस्तूरखुद्द शासनाचेच धोरण आहे. परंतु सरकार ग्रामीण भागात दळणवळणासाठी निधी उपलब्ध करून देत नाही. त्याचा परिणाम जाणवत आहे.