भारतीय इतिहास विजयाचाच वर्षा कोल्हटकर : इस्रायलमधील भारतीय शौर्यगाथेचे उलगडले अंतरंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 01:21 AM2018-01-31T01:21:11+5:302018-01-31T01:21:47+5:30
नाशिक : भारतीय इतिहास हा पराभवाचा नसून तो विजयाचाच आहे. परंतु, आजपर्यंत भारतीय वीरांच्या विजयगाथांपेक्षा पराभवाच्या कथाच अधिक रंगवल्या गेल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक वर्षा कोल्हटकर यांनी व्यक्त केली.
नाशिक : भारतीय इतिहास हा पराभवाचा नसून तो विजयाचाच आहे. परंतु, आजपर्यंत भारतीय वीरांच्या विजयगाथांपेक्षा पराभवाच्या कथाच अधिक रंगवल्या गेल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक वर्षा कोल्हटकर यांनी व्यक्त केली. शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक रविकुमार अय्यर यांच्या ‘इंडियन हिरोइजम इन इस्राइल’ या इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद ‘इस्रायलमध्ये भारतीय वीरांची शौर्यगाथा’ या पुस्तकाविषयी विचारमंथन करताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर न्यासाचे अध्यक्ष आशिष कुलकर्णी, लेखक रविकुमार अय्यर, बेने इस्रायली समाजाचे प्रतिनिधी सॅम्युअल डॅनियर व अनुवादक अनिल कोल्हटकर उपस्थित होते. यावेळी बोलताना कोल्हटकर यांनी इंग्रजी सैन्याने माघार घेतल्यानंतरही या सैन्यातील भारतीय तुकड्यांनी इस्रायलच्या लढाईत गाजवलेली शौर्यगाथा कथन केली. आधुनिक इस्रायलच्या इतिहासाचे पहिले पान ९०० भारतीय जवानांच्या बलिदानाचे असून, त्यांनी २३ सप्टेंबर १९१८ रोजी हायफा बंदर मुक्त करताना प्राणाहुती दिली. यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सुनित पोतनीस यांनी इस्रायल आणि भारत संबंधांविषयी विविध पैलू उपस्थिताना उलगडून सांगितले.
अनुवाद करण्याची गरज
ऐतिहासिक पराक्रम, लेखक रविकुमार अय्यर यांनी शब्दबद्ध केला असून, त्या माध्यमातून भारतीय वीरांच्या शौर्याचा एक अध्याय जगासमोर असून, हा इतिहास मराठी माणसांसह महाराष्ट्रात राहणाºया बेनी इस्रायली समाजालाही माहीत होण्यासाठी त्याचा मराठी अनुवाद करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.