शत-प्रतिशत ‘युती’चा नाशिक विभागात वरचष्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 02:40 AM2019-05-24T02:40:25+5:302019-05-24T02:41:51+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचे गारुड मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही मतदारांवर कायम राहिल्याचे दिसून आले आहे. उत्तर महाराष्टतील सर्वच्या सर्व आठ जागांवर महायुतीने विजय संपादन करत विरोधकांना चीत केले.

 Varshma in cent percent of alliance in Nashik division | शत-प्रतिशत ‘युती’चा नाशिक विभागात वरचष्मा

शत-प्रतिशत ‘युती’चा नाशिक विभागात वरचष्मा

Next

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचे गारुड मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाही मतदारांवर कायम राहिल्याचे दिसून आले आहे. उत्तर महाराष्टतील सर्वच्या सर्व आठ जागांवर महायुतीने विजय संपादन करत विरोधकांना चीत केले. काँग्रेस व राष्टवादीच्या उमेदवारांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
नाशिक मतदारसंघात शिवसेनेने तर दिंडोरी मतदारसंघात भाजपने आपल्याकडची जागा कायम राखत विरोधकांना धोबीपछाड दिली. नाशिक मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी पुन्हा एकदा भुजबळ नावाला धक्का दिला, तर दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन करत विरोधकांच्या शिडातील हवा काढून घेतली.
अंबड येथील वेअरहाउसमध्ये गुरुवारी (दि. २३) झालेल्या मतमोजणीत नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी राष्टÑवादीचे समीर भुजबळ यांच्यावर मोठ्या मतांच्या फरकाने विजय संपादन केला. मागील निवडणुकीत राष्टÑवादीचे हेवीवेट नेते छगन भुजबळ यांना पराभूत करत जायंट किलर ठरलेले गोडसे यांनी यंदा समीर भुजबळांचा दणदणीत पराभव करतानाच ४८ वर्षांपूर्वीच्या सलग दोनदा खासदार होण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. १९६७ आणि १९७१ मध्ये भानुदास कवडे यांनी सलग विजयाची नोंद केली होती. गोडसे यांच्या विजयाने ‘नो रिपीट’ यालाही ब्रेक बसला. दिंडोरी मतदारसंघातही भाजपने आपला गड कायम राखला. राष्टÑवादीच्या डॉ. भारती पवार यांनी राष्टवादीचे धनराज महाले यांचा १ लाख ९८ हजार ७७९ इतक्या मताधिक्याने पराभव केला. भारती पवार यांच्या रूपाने जिल्ह्यातून पहिली महिला खासदार निवडून गेली आहे.
नंदुरबार मतदारसंघात भाजपच्या डॉ. हीना गावित यांनी कॉँग्रेसचे अ‍ॅड. के.सी. पाडवी यांचा पराभव केला. जळगाव मतदारसंघातून भाजपचे आमदार उन्मेष पाटील यांनी राष्टवादीचे गुलाबराव देवकर यांचा पराभव केला. रावेरमधून भाजपच्या रक्षा खडसे या विजयी झाल्या. नगरला भाजपचे सुजय विखे यांनी संग्राम जगताप यांचा पराभव केला. शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेचे सदाशिव लोखंडे हे विजयी झाले.
भामरे दुसऱ्यांदा विजयी
धुळे लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी कॉँग्रेसचे कुणाल पाटील यांचा २ लाख २२ हजार मतांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा विजय मिळविला आहे. माजी आमदार अनिल गोटे यांना केवळ ८ हजार ४१८ मते मिळविता आली.

Web Title:  Varshma in cent percent of alliance in Nashik division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.