पाच दिवसांपासून शहरात  वरुणराजाची कृपादृष्टी ओसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 12:37 AM2018-07-30T00:37:54+5:302018-07-30T00:38:09+5:30

पाच दिवसांपासून शहरात पावसाने अचानकपणे विश्रांती घेतली असून शहरात सुर्यदर्शनही होऊ लागले आहे. यामुळे जणू पावसाळा संपला की काय असे भासत आहे. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात जोरदार पावसाची अपेक्षा केली जात असताना अचानकपणे पावसाने उघडीप दिल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे.

Varuna Raja's blessings disappeared in the city for five days | पाच दिवसांपासून शहरात  वरुणराजाची कृपादृष्टी ओसरली

पाच दिवसांपासून शहरात  वरुणराजाची कृपादृष्टी ओसरली

Next

नाशिक : पाच दिवसांपासून शहरात पावसाने अचानकपणे विश्रांती घेतली असून शहरात सुर्यदर्शनही होऊ लागले आहे. यामुळे जणू पावसाळा संपला की काय असे भासत आहे. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात जोरदार पावसाची अपेक्षा केली जात असताना अचानकपणे पावसाने उघडीप दिल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे.  मागील वर्षी जुलैच्या उत्तरार्धात पावसाची हजेरी समाधानकारक राहिली होती; मात्र यंदा त्या तुलनेत वरुणराजाने कृपादृष्टी कमी केली. या हंगामात अद्याप गंगापूर धरणातून उच्चांकी ९ हजार क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गोदावरी या पावसाळ्यात प्रथमच दुथडी भरुन वाहताना नाशिककरांनी बघितली.  रविवारी (दि.२९) इगतपुरी, दारणा धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात शुन्य मि.मी पावसाची नोंद झाली. तसेच गंगापूर, काश्यपी, गौतमी धरण समुहाच्या क्षेत्रातही पावसाने हजेरी लावल्याची नोंद जलसंपदाविभागाकडे नाही. गंगापूर धरणाचा जलसाठा ४ हजार २७४ दलघफू इतका असून धरण ७५.९१ टक्के भरले आहे. सध्या गंगापूरमधून ६३२ क्युसेस इतका विसर्ग गोदापात्रात होत आहे. तसेच काश्यपी धरणामधील पाण्याची पातळी १ हजार ५६८ दलघफूपर्यंत पोहचली असून धरण ८४.६६ टक्के भरले आहे. तसेच गौतमी धरणाचा जलसाठा १ हजार ३२६ दलघफू इतकी झाली आहे. धरणसाठा ८४.६६ टक्क्यांवर पोहचला आहे. या दोन्ही धरणातून काही प्रमाणात गंगापूर धरणक्षेत्रात पाण्याची आवक सुरू आहे. दारणा धरण८४.८८ टक्के भरले असून भावली १०० टक्के भरले आहे.
जुलै महिन्यातील पावसाचा उच्चांक
यावर्षी १६ तारखेच्या सकाळी साडेआठ वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठवाजेपर्यंत २४ तासांत ५६ मि.मी इतका पावसाचा उच्चांक हवामान केंद्राकडून नोंदविला गेला. गेल्या वर्षी जुलैच्या पंधरवड्यात १४ तारखेला सकाळी साडेआठवाजेपर्यंत २४ तासांत ७१.६ मि.मी इतका पाऊस झाल्याची नोंद केंद्राकडे आहे. एकूणच या आकडेवारीवरुन यावर्षी जुलै महिन्यातील पर्जन्यमान घसरल्याचे दिसते.
खड्डे बुजविण्याबाबत उदासीनता
पावसाने उघडीप देऊन पाच दिवस उलटले असले तरी अद्याप महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला शहर व उपनगरांमधील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मुहूर्त लागलेला नाही. पावसाने उघडीप दिल्याची संधी साधून युध्दपातळीवर चांगल्याप्रकारे मुरूम, कचचा वापर करुन खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Varuna Raja's blessings disappeared in the city for five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस