ेदिंडोरी तालुक्यावर वरुणराजा नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 07:29 PM2019-07-04T19:29:41+5:302019-07-04T19:30:26+5:30
पांडाणे : पावसाळा सुरू होवून जुन महीना संपला असून जुलै महीन्याला सुरवात झाली तरी दिंडोरी तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा हवाई दिल झाला आहे.
पांडाणे : पावसाळा सुरू होवून जुन महीना संपला असून जुलै महीन्याला सुरवात झाली तरी दिंडोरी तालुक्यात पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा हवाई दिल झाला आहे.
त्यामुळे दरवर्षी रोहीणी नक्षत्रालाच पावसाचे आगमन होत असते, तेव्हा दिंडोरी तालुक्यातील दक्षिणपट्यात मान्सून पुर्व शेतीच्या मशागत केल्यानंतर बळीराजा आपल्या शेतात नागली, भात, वरी, पिकाचे रोप टाकण्यास सुरवात ज्या शेतात करतात त्याच शेतात आज मुलांनी क्रि केटचे मैदान केल्याचे दिसत आहे. याच शेतात सद्या मुले क्रिकेट खेळत आहेत. पावसाच्या दुर्लक्ष्यामुळे आता रोपे कधी टाकावी व इतर पिकाची पेरणी कधी करायची अश्या विवंचनेत बळीराजा सापडला आहे.
दिंडोरी तालुक्यातील अंबानेर सागपाडा येथील भाताची शेतीच झाली क्रिकेट मैदान.
(फोटो ०४ पांडाणे)