वसंत बापट कवितेवर निष्ठा असलेले कवी : बाळासाहेब गुंजाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 12:06 AM2019-09-19T00:06:05+5:302019-09-19T00:06:46+5:30

तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले वसंत बापट हे त्यांच्या सामाजिक व राष्ट्रीयतेच्या जाणिवेतून रचना करणारा आणि कवितेवर निष्ठा असणारा कवी म्हणून परिचित असून त्यांच्या काव्यरचनांमधून प्रसंगाचे नाट्यमय दर्शन घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब गुंजाळ यांनी केले.

 Vasant Bapat Poets Loyal to Poetry: Balasaheb Gunjal | वसंत बापट कवितेवर निष्ठा असलेले कवी : बाळासाहेब गुंजाळ

वसंत बापट कवितेवर निष्ठा असलेले कवी : बाळासाहेब गुंजाळ

googlenewsNext

नाशिक : तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले वसंत बापट हे त्यांच्या सामाजिक व राष्ट्रीयतेच्या जाणिवेतून रचना करणारा आणि कवितेवर निष्ठा असणारा कवी म्हणून परिचित असून त्यांच्या काव्यरचनांमधून प्रसंगाचे नाट्यमय दर्शन घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक बाळासाहेब गुंजाळ यांनी केले.
कुसुमाग्रस स्मारकातील विशाखा सभागृहात सोमवारी (दि.१६) संवाद संस्थेतर्फे ‘वसंत बापट कवी व कविता’ विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. व्यासपीठावर नाशिक जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, डॉ. पी. एस. पवार व संवादचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी उपस्थित होते. बाळासाहेब गुंजाळ म्हणाले, वसंत बापट यांच्या काव्य रचना सामाजिक आणि राष्ट्रीय जाणिवेच्या असून, त्यांनी ज्याप्रमाणे प्रेम कविता व निसर्ग कविता केल्या तितक्याच सहजतेने बालक विताही केल्या. त्यांची ‘फुंकर’सारखी असफल प्रितीची कविता प्रसंगातील नाट्य काव्यशैलीत टिपण्याचे क ौशल्य शिकवून जाणारी आहे, तर दुष्काळासाख्या बिकट स्थितीविषयी उदासीन असलेल्या शासकीय यंत्रणेवर कोरडे ओढणाऱ्या उपरोधात्मक कविताही प्रभावशाली असल्याचे गुंजाळ म्हणाले. वसंत बापट यांच्या ‘बिजली’ या काव्यसंग्रहासह सेतू, अकरावी दिशा, सकिना, मानसी, लावणी अणि लावणी शैलीतीलकविता कधी धीटपणे तर कधी हळुवार भावना व्यक्त करणाºया असल्याचे सांगतानाच बापट यांच्या कवितांविषयी गुंजाळ यांनी विविधांगी पैलू उपस्थिताना उलगडून सांगितले. प्रास्तविक डॉ. किरण पिंगळे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा बोराडे यांनी केले, तर आभार ज्योती फड यांनी मानले.

Web Title:  Vasant Bapat Poets Loyal to Poetry: Balasaheb Gunjal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.