ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन

By Admin | Published: October 30, 2016 01:36 AM2016-10-30T01:36:57+5:302016-10-30T01:37:58+5:30

ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन

Vasant Palshikar dies of senior thoughtist | ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर यांचे निधन

googlenewsNext

नाशिक : महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारे ज्येष्ठ विचारवंत व लेखक वसंत पळशीकर यांचे शनिवारी (दि.२९) पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा माधव पळशीकर व परिवार आहे.
वसंत पळशीकर १२ वर्षांपासून अर्धांगवायूने आजारी होते. या आजारपणातच त्यांचे निधन झाले. पळशीकर यांनी समाज प्रबोधन पत्रिका व नवभारत नियतकालिकांचे संपादकपदही भूषविले. लोकशाही, समाजवाद व त्या अनुषंगाने येणाऱ्या विविध विषयांवर सुमारे सातशे दीर्घलेखांसह त्यांनी विस्तृत लेखन केले. मार्क्सवाद, समाजवाद, फुले-आंबेडकर विचारांच्या भूमिकांची त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण मांडणी अनेकांना वेगळी दृष्टी देणारी ठरली. त्यांच्या निधनामुळे एक स्वतंत्र विचार करणारा व करायला लावणारा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. पळशीकर यांचा जन्म हैदराबादमध्ये १९३६ मध्ये झाला होता.
महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहस्रबुद्धे, साने गुरु जी, अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे अशा दिग्गजांचा त्यांना सहवास लाभला. त्यांचा मित्रपरिवारही भारतभर होता. भालचंद्र नेमाडे, भोळेसर यांच्यासह लहानथोर कार्यकर्त्यांचा त्यांच्या मित्र परिवारात समावेश आहे. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवा संघाच्या कामात त्यांचा सक्रि य सहभाग होता. सन १९५९ मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला त्यांनी स्वत:ला वाहून घेतले. कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा - संमेलने यात त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्थांना त्यांची मांडणी नेहमीच मार्गदर्शक ठरली. संथ आणि शांत शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट होते. त्यांच्या पार्थिवावर अमरधाम येथील डिझेल दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)

पळशीकर यांची साहित्यसंपदा
वसंत पळशीकर यांच्या साहित्यसंपदेत सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण, जमातवाद, धर्म, धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धा ही वैचारिक पुस्तके आहेत. बी. आर. नंदा लिखित गोपाळ कृष्ण गोखले यांच्या चरित्राचा व थिओडोर शुल्टझ यांच्या शेतीविषयक पुस्तकाचा अनुवाद त्यांनी केला. सोविएत रशियाची पन्नास वर्षे खंड १ व २ आणि मे. पुं. रेगे यांचा लेखसंग्रह विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धाचे त्यांनी संपादन केले आहे.



 

Web Title: Vasant Palshikar dies of senior thoughtist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.