वासंतिक नवरात्र महोत्सव ६ एप्रिलपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:42 AM2019-03-31T00:42:00+5:302019-03-31T00:44:15+5:30
श्री काळाराम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री काळाराम संस्थानच्या वतीने वासंतिक नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, येत्या शनिवारपासून (दि.६) काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोत्सवाला सुरु वात करण्यात येणार आहे.
पंचवटी : श्री काळाराम जन्मोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री काळाराम संस्थानच्या वतीने वासंतिक नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, येत्या शनिवारपासून (दि.६) काळाराम मंदिरात वासंतिक नवरात्र महोत्सवाला सुरु वात करण्यात येणार आहे.
शनिवारी सायंकाळी ७ वाजता प्रा. सचिन कानिटकर यांच्या हस्ते तसेच संस्थांचे अध्यक्ष जिल्हा व सत्र न्यायाधीश गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली वासंतिक नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार आहे. सायंकाळी मानसी पाटील व सहकारी स्वागत गीत सादर करतील, तर रेणुका पुजारी यांचा भरतनाट्यम कार्यक्र म होईल. शनिवारी (दि.६) ते सोमवारी (दि.८) या कालावधीत सचिन कानिटकर यांचे व्याख्यान होणार आहे. रविवारी (दि.७) सकाळी राधिका गोडबोले व सहकारी संकेत बरडिया सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण कार्यक्र म सादर करतील, तर मंगळवारी आणि बुधवारी रामनाथ रावल यांचे व्याख्यान होणार आहे.
गुरुवारी (दि.११) अंबादास कुलकर्णी यांचे आरोग्य आणि आयुर्वेद तर शुक्र वारी (दि.१२) दुपारी सप्तमी महाप्रसाद वाटप करण्यात येईल त्यानंतर दुपारी तीन वाजता नरेशबुवा पुजारी आध्यात्मिक रामायण व ऋग्वेद पठण कार्यक्रम सादर करतील शनिवारी (दि.१३) रामनवमी असल्याने राममंदिरात दुपारी १२ वाजता श्री काळाराम जन्मोत्सव साजरा केला जाईल, तर रविवारी (दि.१४) कार्यक्र म होईल हस्ते प्रमोद केणे यांचे दिव्यत्वाची तेथे प्रचिती विषयावर व्याख्यान संपन्न होईल. तसेच संस्थांनचे अध्यक्ष गणेश देशमुख यांच्या हस्ते राम याग कार्यक्र म होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्र मात संगीत अथंग आवली, अवघा रंग एक झाला, गीत रामायण, तसेच राम रतन धन पायो, अभंगवाणी, नृत्य भक्तिरंग भरतनाट्यम आदींसह विविध कार्यक्र म होणार आहे. कार्यक्र मांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री काळाराम संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा सत्र न्यायाधीश गणेश देशमुख, पांडुरंग बोडके आदींनी केले आहे.
रथयात्रा
मंगळवारी (दि.१६) सायंकाळी ५ वाजता श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून पारंपरिक मार्गाने सवाद्य श्रीराम व गरु ड रथयात्रा काढण्यात येणार आहे. शनिवारी गुढीपाडव्याला सायंकाळी मंदिर परिसरात बसविल्या जाणाऱ्या कॅमेऱ्याचे लोकार्पण कार्यक्र म होणार आहे.