बबनराव कांगणे यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 06:57 PM2021-04-18T18:57:20+5:302021-04-18T19:04:05+5:30
एकलहरे : हिंगणवेढे येथील बबनराव कांगणे यांना शासनाचा सन २०१८ चा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कार जाहीर झाला आहे.
एकलहरे : हिंगणवेढे येथील बबनराव कांगणे यांना शासनाचा सन २०१८ चा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी' पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्यात कृषी,कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्था यांना कृषिरत्न, कृषिभूषण, शेतीमित्र, शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, कृषिसेवारत्न, राज्यस्तरीय पीक स्पर्धा पुरस्कार दिले जातात. शासनातर्फे या पुरस्कारार्थींच्या नावांची घोषणा करण्यात आली. यामध्ये हिंगणवेढे येथील कांगणे नर्सरीचे संस्थापक संचालक बबनराव धोंडीराम कांगणे यांना सन २०१८ चा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार' घोषित झाला आहे. कांगणे यांनी सर्व प्रकारच्या पिकांची, फळझाडांची, फुलझाडांची रोपे एकाच ठिकाणी अत्याधुनिक पध्दतीने तयार करून, माफक दरात उपलब्ध करून देण्यासाठी आधुनिक रोपवाटिका निर्माण केल्या आहे. या माध्यमातून रोजगाराची संधीही त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.
(१८ बबन कांगणे)