वसाकाने थकविली ऊसतोडणी ठेकेदारांची देयके आंदोलनाची तयारी : साखर उपआयुक्तांकडे दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:20 AM2018-03-09T00:20:29+5:302018-03-09T00:20:29+5:30
नाशिक : विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्यासाठी सन २०१५-१६ मध्ये कार्यक्षेत्रातील ऊसतोडीसाठी मजुरांचे ठेके घेणाºया ठेकेदारांचे गेल्या दोन वर्षांपासून कारखान्याने पैसे थकविले.
नाशिक : विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्यासाठी सन २०१५-१६ मध्ये कार्यक्षेत्रातील ऊसतोडीसाठी मजुरांचे ठेके घेणाºया ठेकेदारांचे गेल्या दोन वर्षांपासून कारखान्याने पैसे थकविले असून, कारखान्याकडे तगादा लावून वैतागलेल्या ठेकेदारांनी आता थेट कारखान्याचे अध्यक्ष आमदार डॉ. राहुल अहेर यांच्या घरासमोरच आंदोलनाची तयारी चालविली आहे. यासंदर्भात दोन दिवसांपूर्वीच नऊ ठेकेदारांनी ऊसतोड मजूर कामगार संघटनेचे पदाधिकारी डॉ. डी. एल. कराड, कॉ. श्रीधर देशपांडे यांच्यासमवेत निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील गेवराई येथील मजुरांकरवी वसंतदादा सहकारी साखर कारखान्यासाठी सन २०१५-१६ मध्ये कार्यक्षेत्रातील ऊसतोड करण्यात आली होती. मजुरांचा ठेका घेऊन त्याची वाहतूक करण्याची जबाबदारीही ठेकेदारांवर होती. परंतु कारखान्याने ठेकेदारांचे कमिशन व ऊसतोडणी वाहतूक अनामत रकमेची वारंवार मागणी करूनही पैसे देण्यात आलेले नाहीत.