तीन दिवसांत १३८ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 05:26 PM2018-08-27T17:26:05+5:302018-08-27T17:27:14+5:30

कुटुंब नियोजन : दुर्गम भागातील पळसन आरोग्य केंद्रात विक्रमी नोंद

Vasectomy surgery on 138 men in three days | तीन दिवसांत १३८ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया

तीन दिवसांत १३८ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया

Next
ठळक मुद्दे ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’चे महत्व जाणत पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेला प्रतिसाद

नामपूर : सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या पळसन परिसरातील ग्रामस्थांनी ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’चे महत्व जाणत पुरूष नसबंदी शस्त्रक्रियेला प्रतिसाद दिल्याने केंद्राने वर्षभराचे उद्दिष्ट तीन दिवसातच पूर्ण केले आहे. तीन दिवसात १३८ पुरुषांवर नसबंदी शस्त्रक्रिया झाल्याने जिल्ह्यात विक्रमी नोंद झाली आहे.
वंशाचा दिवा म्हणून मुलाचा हट्ट न धरता व पारंपरिक स्त्रीयांच्या शस्त्रक्रियेला छेद देत शेकडो पुरूष कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पुढे आले आहेत. पळसन येथील आरोग्य कर्मचाऱ्यांनी संवाद कौशल्याने नागरिकांचे मतपरिवर्तन करून ही किमया साधली आहे. पुरूष नसबंदी शस्त्रक्रिया घेऊन नाशिक जिल्ह्यातील १०५ प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सर्व प्रथम कुटुंब कल्याण नियोजनाचे उद्दिष्ट पूर्ण करणारे पळसन आरोग्य केंद्र हे पहिले केंद्र ठरले आहे. सुरगाणा तालुक्यात अतिवृष्टी असतानाही नागरिकांनी त्याला उत्तम प्रतिसाद दिला. यंदा १३८ कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट शासनाने पळसन केंद्रास दिले होते. मात्र तीन शिबिरांमध्ये तीन आठवडयाच्या कालावधीत १३८ कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे उद्दिष्टय पूर्ण करण्यात आले आहे. डॉ. समाधान पाटील यांच्या नेतृत्वाखाली केंद्राने हे उद्दिष्ट यशस्वी पार पाडले. पळसन, बा-हे, मनखेड, पांगारणे,माणी येथील कार्य क्षेत्रातील पुरुषांची शस्त्रक्रिया  पळसन येथे करण्यात आली. मागील वर्षी नाशिक जिल्हा कुटुंब नियोजन कार्यक्र मात महाराष्त प्रथम आला होता. त्यात सुरगाणा तालुक्याचा सिंहाचा वाटा होता.

५०० शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट
यावर्षी ५०० शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट आहे. पळसन येथे यापूर्वी मी काम केलेले आहे, त्यामुळे कार्यक्षेत्राची पुर्ण कल्पना असल्याने तेथील लोकांच्या परिस्थितीची जाणीव आहे. कुटुंब छोटे असले तर आपण प्रगती करू अशी त्यांची भावना आहे. म्हणूनच हे विक्र मी काम येथील सहाय्यक अब्बू शेख व इतर कर्मचा-यांच्या माध्यमातून आम्ही करु शकलो.
- डॉ. समाधान पाटील.

Web Title: Vasectomy surgery on 138 men in three days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Familyपरिवार