वासुदेव आला रे वासुदेव आला, प्लास्टिक वापरावर बंदी घाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 01:05 PM2017-12-22T13:05:29+5:302017-12-22T13:06:13+5:30

पेठ - वाढत्या पर्यावरणाच्या ºहासाला कारणीभूत ठरणाºया प्लॅस्टिकमुळे सामान्य जनतेसह जनावरांना अनेक घातक रोगांचा विळखा घातला असून गाव शहरांचे प्रदुषण वाढवणार्या प्लास्टिक वर बंदी यावी व नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी पेठ शहर व तालुक्यात भल्या पहाटे वासुदेवाची स्वारी फिरून या घातक वस्तूवर आळा घालण्याची हाक देत असतांना दिसून येत आहे.

Vasudev ala ras Vasudev came, ban plastic use ... | वासुदेव आला रे वासुदेव आला, प्लास्टिक वापरावर बंदी घाला...

वासुदेव आला रे वासुदेव आला, प्लास्टिक वापरावर बंदी घाला...

googlenewsNext

पेठ - वाढत्या पर्यावरणाच्या ºहासाला कारणीभूत ठरणाºया प्लॅस्टिकमुळे सामान्य जनतेसह जनावरांना अनेक घातक रोगांचा विळखा घातला असून गाव शहरांचे प्रदुषण वाढवणार्या प्लास्टिक वर बंदी यावी व नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी पेठ शहर व तालुक्यात भल्या पहाटे वासुदेवाची स्वारी फिरून या घातक वस्तूवर आळा घालण्याची हाक देत असतांना दिसून येत आहे.
पेठ येथील एकपात्री कलाकार संकेत नेवकर हे नगरपंचायत व तालुका क्षेत्रात प्लॅस्टिकमुक्ती अभियान राबवत आहेत. आठवडे बाजारात भाजीविक्र ेते व ग्राहकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ते वासुदेवाचा वेश परिधान करून लोकांना प्लॅस्टिक वापरापासून विविध ओव्यांच्या माध्यमातून परावृत करतात. मी येथे कॅरीबॅग मिळत नाही व मी बाजारात जातांना कापडी पिशवी नेतो.. तुम्ही ? अशा प्रकारचे संदेश देत त्यांनी जनजागृती अभियान सुरू केले आहे.
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत संगमेश्वर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून संकेत नेवकर यांनी तालुक्यातील वाडी वस्तीवर जाऊन एकपात्री प्रयोगातून गावकर्यांचे प्रबोधन केले. यामधून त्यांनी प्लॅस्टिक पासून होणारे दुष्परिणाम, घातक आजार व पर्यावरणावर होणारा विपरित परिणाम लोकांच्या मनात रु जवण्याचे काम सुरू केले आहे. नागरिकही त्यांच्या हया अभियानाला चांगला प्रतिसाद देत असून गावागावात त्यांच्या प्रबोधनाने नागरिकांनी प्लॅस्टिकवर बंदी आणण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
नगरपंचायतचे ब्रँड अ‍ॅम्बेसिडर
पेठ नगरपंचायत क्षेत्रात संपूर्ण प्लॉस्टिक बंदी अभियान राबवण्यात येत असून यासाठी नागरिक, व्यापारी व ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी शिवकलाकार संकेत नेवकर यांची ब्रँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. आपल्या एकपात्री प्रयोगातून पेठच्या सार्वजनिक ठिकाणी, भाजीबाजार व शासकिय कार्यालयात संकेत यांनी प्रबोधनात्मक प्रयोग सादर केले. भाजीबाजारात कापडी पिशवी आणणाºया ग्राहकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

Web Title: Vasudev ala ras Vasudev came, ban plastic use ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक