वटारला शेतीची कामेही बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2020 04:03 PM2020-03-22T16:03:10+5:302020-03-22T16:03:21+5:30
वटार : परिसरातील नागरिकांनी स्वत:हून घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतला, गावात शुकशुकाट होता. कोणीही आपल्या घरातून बाहेर पडले नाही. सर्व शेतीव्यवसायही एक दिवसासाठी बंद ठेवून कर्फ्यूला साथ दिली. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिक गर्दी करण्याचे टाळत आहेत.
Next
ठळक मुद्दे कोरोना रोगाची माहिती गावातील नागरिकांना माहिती होण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने क्लिप तयार करून रोज सकाळी व सायंकाळी गावातून दवंडीसारख्या सूचना देण्यात येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरपंच कल्पना खैरनार यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत आरोग्य तपासणी करण्य
सर्वत्र निर्मनुष्य झालेली दुकाने बंद, सर्व गावगाड्याचा कारभारच थांबला. गावातील जनतेला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. शेतमजुरी करणाºया मजुरांनीही एक दिवसाची सुट्टी घेतली. शेतीकामे एक दिवसासाठी बंद ठेवल्याने ती ठप्प झाली.
-----
जनता कर्फ्यूला संपूर्ण जनतेने प्रतिसाद दिला. सकाळपासून गावात एकदम शुकशुकाट होता. जनतेने घाबरून न जाता स्वत:ची काळजी घ्यावी, गर्दी टाळा. स्वत: व तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवा. अजून काही दिवस गर्दीत जाण्याचे टाळा. शासनाच्या आदेशांचे पालन करण्याचे आवाहन पंचायत समितीचे माजी सभापती धर्मराज खैरनार यांनी केले.