वात्सल्य वृद्धाश्रमात रंगला सांज पाडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 01:11 IST2019-04-09T01:10:52+5:302019-04-09T01:11:06+5:30
वयोवृद्धांच्या आयुष्यात पाडव्याचा गोडवा निर्माण करण्यासाठी वात्सल्य वृद्धाश्रमात सांज पाडवा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

वात्सल्य वृद्धाश्रमात रंगला सांज पाडवा
नाशिक : वयोवृद्धांच्या आयुष्यात पाडव्याचा गोडवा निर्माण करण्यासाठी वात्सल्य वृद्धाश्रमात सांज पाडवा या संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या जमान्यातील अवीट गोडीच्या सुमधुर गीतांचा आश्रमातील वयोवृद्धांनी मनमुराद आनंद घेतला.
टाकळीरोडवरील वात्सल्य वृद्धाश्रमात ‘कारवा करा ओके क्लब’ यांनी सांज पाडवा हा संगीतमय कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोकमतचे निवासी संपादक किरण अग्रवाल, सौंदर्यवती शिल्पी अवस्थी, नितीन राका, अमित कलंत्री, शुभदा बोरा उपस्थितीत होते. मराठी व हिंदी चित्रपटांतील गीतांचा रंगारंग कार्यक्रम यावेळी सादर करण्यात आला. क्लबचे प्रमुख रिधम शहा यांच्यासह अलिशा निमोणकर, आरती चव्हाण, निशांत भोईर, गायत्री हारक, डॉ. दीपिका पाटील, निवेदिता अथनी, संजीवनी बक्षी व खिमजीभाई शहा यांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर केली. त्यांच्या गीतांचा आजी-आजोबांनी उत्स्फूर्त दाद देत तालही धरला.
या कार्यक्रमासाठी समीर निमोणकार यांनी ध्वनीसंचालकाची जबाबदारी सांभाळली. सूत्रसंचालन संजय भोसले यांनी केले. या कार्यक्रमाचे नियोजन वात्सल्यतर्फे सतीश सोनार, अभय पालवे व इतर सभासद यांनी केले होते.