मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी वायुनंदन

By admin | Published: March 7, 2017 02:30 AM2017-03-07T02:30:17+5:302017-03-07T02:31:14+5:30

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Vayandanan as the Vice Chancellor of the Open University | मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी वायुनंदन

मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी वायुनंदन

Next

नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरुपदी दिल्ली येथील इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ.ई. वायुनंदन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती डॉ. सी. विद्यासागर राव यांनी सोमवारी डॉ. वायुनंदन यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. गेल्या दोन महिन्यांपासून कुलगुरु निवडीची प्रक्रिया सुरू होती. कुलगुरुपदासाठी विक्रमी अर्ज आल्याने या निवडीकडे शिक्षणक्षेत्राचे लक्ष लागले होते. बुधवारी वायुनंदन पदभार स्वीकारणार आहेत.
डॉ. माणिकराव साळुंखेयांनी १९ आॅगस्ट २०१६ मध्ये मुदतीपूर्वीच कुलगुरूपदाचा राजीनामा दिल्याने कुलगुरूपद रिक्त होते. साळुंखे यांच्या राजीनाम्यामुळे अनेक उलटसुलट चर्चा सुरू होती. दोन महिन्यांपासून नूतन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू होती. आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याकडे मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता.  डॉ. वायुनंदन यांनी हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठातून लोकप्रशासन या विषयात एम.ए.एम.फील तसेच पीएचडी प्राप्त केली असून, उच्च शिक्षण क्षेत्रातील अध्यापन तसेच संशोधनाचा त्यांना व्यापक अनुभव आहे.

Web Title: Vayandanan as the Vice Chancellor of the Open University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.