आयसीएसईमध्ये वेदांत, रिया टॉपर्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 01:39 AM2018-05-15T01:39:01+5:302018-05-15T01:39:01+5:30
आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत शहरातील विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलच्या वेदांत देव याने ९८.४० टक्के तर अशोका युनिव्हर्सल स्कूलची रिया पाटील हिने ९८.३३ टक्के तर राज सुराणाने ९७.६७ टक्के गुण मिळवत टॉपर ठरले आहेत.
नाशिक : आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत शहरातील विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलच्या वेदांत देव याने ९८.४० टक्के तर अशोका युनिव्हर्सल स्कूलची रिया पाटील हिने ९८.३३ टक्के तर राज सुराणाने ९७.६७ टक्के गुण मिळवत टॉपर ठरले आहेत. याबरोबरच पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा अथर्व दुर्गप्रसाद ९७.२० टक्के, प्रथमेश गांधी ९६.५० टक्के, फ्रावशीची मानसी कुलकर्णी ९६.५० टक्के व होरायझनची पूर्वा जाधव ९६.३७ टक्के गुण मिळविणारे हे विद्यार्थी शहरात टॉपर्स ठरले आहेत. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत शहरातील बहुतांश शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यात विज्डम हाय इंटरनॅशनल स्कूलचा वेदांत देव याने दहावीत ९८.४० टक्के गुण मिळवून पहिला क्र मांक पटकावला, तर सृष्टी पाठक व सम्यक जैन, रु णाली भंडारी व सिया सिसोदिया यांनी ९७.४० टक्के गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्र मांकाचे यश मिळवले. शाळेतील १५८ पैकी ८५ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले, तर बारावीमध्ये काव्या गोखले हिने ९५.५० टक्के गुण मिळवून यश संपादन केले. तर पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा १०० टक्के निकाल जाहीर झाला असून, ८२ पैकी १३ विद्यार्थी २० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले असून शाळेत अर्थव दुर्गप्रसादने ९७.२० टक्के, प्रथमेश गांधी ९६.५० टक्के, निधी उपासनी ९५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
रायन इंटरनॅशनल स्कूलच्या १५४ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थ्यांनी मेरिट प्राप्त केली आहे. यात पारूल सिंग या विद्यार्थिनीने सर्वाधिक ९६.१७ टक्के गुण मिळविले असून, वरुण कुसाबीने ९४.१७ टक्के, संस्कृती तिडकेने ९४ टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला आहे.