वेदांत संपूर्ण मानवजातीचे कल्याण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 12:09 AM2017-09-12T00:09:31+5:302017-09-12T00:10:06+5:30
मुकुंदकाका जाटदेवळेकर : वैदिक महाविद्यालयाकडून ‘राष्टÑीय पंडित पुरस्कार’ नाशिक : वेद संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असून, भारतीय संस्कृतीचे अस्तित्व वेदांमुळे टिकून आहे. पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक आबालवृद्धाच्या सर्वांगीण कल्याणाचा मार्ग वेदांनी सांगितला आहे. वेदांचे रक्षण करण्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची आजच्या युगात वैदिकांवर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर यांनी केले.
मुकुंदकाका जाटदेवळेकर : वैदिक महाविद्यालयाकडून ‘राष्टÑीय पंडित पुरस्कार’
नाशिक : वेद संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी असून, भारतीय संस्कृतीचे अस्तित्व वेदांमुळे टिकून आहे. पृथ्वीतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक आबालवृद्धाच्या सर्वांगीण कल्याणाचा मार्ग वेदांनी सांगितला आहे. वेदांचे रक्षण करण्याचे महत्त्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याची आजच्या युगात वैदिकांवर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन प्रज्ञाचक्षू मुकुंदकाका जाटदेवळेकर यांनी केले.
तपोवन केवडीबनातील वैदिक ज्ञान-विज्ञान संस्कृत महाविद्यालयाच्या वतीने वैदिकसम्राट पंडित श्रीकृष्णशास्त्री गोडसे गुरुजी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राष्टÑीय पंडित पुरस्कार प्रदान सोहळा सोमवारी (दि.११) संपन्न झाला. परशुराम साईखेडकर सभागृहात झालेल्या या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून जाटदेवळेकर मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी त्यांच्या हस्ते वेदाचार्य लक्ष्मीकांत मथुरादास दीक्षितशास्त्री यांना ‘राष्टÑीय पंडित पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच गोकर्ण महाबळेश्वरचे वैदिकरत्न श्रीधर अडी: यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य शांताराम भानोसे, उपाध्यक्ष अंजली जाधव, उपप्राचार्य दिनेश गायधनी, जयंत जोशी उपस्थित होते. यावेळी जाटदेवळेकर म्हणाले, वेदांचे संशोधन करणारे खूप लोक आहेत. वेदांचे अध्ययन करणाºयाला वैदिक, पंडित, शास्त्री या शब्दांनी संबोधले जाते.या विद्यार्थ्यांचा गौरव संहिता पूर्ण क रणारे, जाटपाठी, घनपाठी यांच्यासह पाठशाळेमधील गुणवंत यश जोशी, हेरंब कुलकर्णी, सिद्धेश जोशी, रोपकर, निकेल जोशी, धनंजय दीक्षित, विजय पाठक, तुषार कुलकर्णी, मकरंद जोशी, अभिषेक कुलकर्णी, राहुल दीक्षित, प्रणव कुलकर्णी, राहुल बेळे, स्वप्नील जोशी यांच्यासह गुणवंतांना गुरुजींच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.