वेदाध्ययनातील शिक्षण चिरकाल टिकणारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 01:07 AM2019-01-14T01:07:10+5:302019-01-14T01:07:44+5:30
वेद शिक्षणाचे वेगळे महत्त्व असून, त्याचे अध्ययन आवश्यक आहे. शिवाय गरजेनुसार व्यावहारिक- व्यावसायिक शिक्षणही आवश्यक आहे. अर्थात, वेद शिक्षण हे स्थायी असून, हा देह त्याग केल्यानंतर पुढील जन्मातही देहात गेल्यानंतरही पुण्याचे संक्रमण होत असते त्यामुळे या शिक्षणाचे महत्त्व अधिक आहे, असे मत शृंगेरीपीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांनी केले.
नाशिक : वेद शिक्षणाचे वेगळे महत्त्व असून, त्याचे अध्ययन आवश्यक आहे. शिवाय गरजेनुसार व्यावहारिक- व्यावसायिक शिक्षणही आवश्यक आहे. अर्थात, वेद शिक्षण हे स्थायी असून, हा देह त्याग केल्यानंतर पुढील जन्मातही देहात गेल्यानंतरही पुण्याचे संक्रमण होत असते त्यामुळे या शिक्षणाचे महत्त्व अधिक आहे, असे मत शृंगेरीपीठाचे शंकराचार्य जगद्गुरू श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांनी केले.
वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय अर्थात गुरुकुलच्या वतीने येथील चित्तपावन मंगल कार्यालयात श्री लक्ष्मी-कुबेर याग सुरू असून, याठिकाणी शंकराचार्य श्री विधुशेखर भारती स्वामीजी यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी संस्कृत भाषा, वेद आणि यागाचे महत्त्व सांगितले. संस्कृत भाषा ही आद्य भाषा असून, सर्व भाषांची जननी असल्याचे ते म्हणाले.
संस्थेच्या वतीने महावस्त्र देऊन सन्मानही भालचंद्रशास्त्री शौचे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे अंजली जाधव, शशी जाधव, मदन देवी, जयंत जोशी, दिनेश गायधनी, महेश पैठणे, सुनेत्रा महाजन आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते.