वीर राघोजी यांच्या प्रतिमेची मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 05:45 PM2018-11-18T17:45:42+5:302018-11-18T17:45:56+5:30
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सोनोशी या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी सोनोशी,व आदिवासी विचारमंच व सर्व आदिवासी संघटना यांच्या वतीने सन्मान बाडगीच्या माचीचा,इतिहास राघोजी च्या क्र ांतिबंडाचा कार्यक्र म पार पडला.यावेळी सकाळी टाकेद या ठिकाणाहुन वीर राघोजी यांच्या प्रतिमेची रथासह मिरवणूककाढण्यात आली.
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्यातील सोनोशी या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी सोनोशी,व आदिवासी विचारमंच व सर्व आदिवासी संघटना यांच्या वतीने सन्मान बाडगीच्या माचीचा,इतिहास राघोजी च्या क्र ांतिबंडाचा कार्यक्र म पार पडला.यावेळी सकाळी टाकेद या ठिकाणाहुन वीर राघोजी यांच्या प्रतिमेची रथासह मिरवणूककाढण्यात आली.यामध्ये टाकेद,बांबळेवाडी,मार्गे सोनोशी,गोडेवाडी व बाडगीची माची अशी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणूकीमध्ये आदिवासी संस्कृतीचे दर्शन व्हावे या उद्देशाने अनेक छोटी-मोठी कलापथकांनी सहभाग नोंदवीला तसेच वासाळी येथील बोहडा कलापथकाने देखील संस्कृतीचे दर्शन घडून आणले.
कार्यक्र माची सुरु वात वीर राघोजी भांगरे व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पुजन करून सुरु वात करण्यात आली.यावेळी रु द्रा देवराम खेताडे या विद्यार्थ्याने भाषणकेले..आद्यक्र ांतिकारक वीर राघोजी भांगरे हे यांचे आश्रयस्थान म्हणुन बाडगीची माची हे ठिकाण आहे.परंतु अनेक दिवसापासुन हे ठिकाण आदिवासी ससमाजाच्या विचाराधीन नव्हते सर्व समाजबांधवाना यांची माहिती व्हावी या उद्देशाने तसेच वीर राघोजी भांगरे यांचा इतिहास समस्त आदिवासी बांधवांपर्यत पोहचावा या उद्देशाने हा कार्यक्र म या ठिकाणी घेतल्याची माहिती आदिवासी समाजबांधव व येथील स्थानिक ग्रामस्थ दत्तु पेढेकर व रघुनाथ गोडे यांनी दिली.े प्रस्ताविक वासाळीचे सरपंच काशिनाथ कोरडे यांनी केले तर सुञसंचलन विरणक यांनी केले