भाजीबाजार प्रवेशद्वारावर जुन्या नाल्याच्या खड्ड्याला घातला पुष्पहार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:09 AM2018-07-24T00:09:12+5:302018-07-24T00:09:40+5:30
नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर जुन्या नाल्याच्या स्लॅबला भगदाड पडूनही मनपाकडून दुर्लक्ष होत असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पूजा करून हार घालून निषेध आंदोलन केले.
नाशिकरोड : नाशिकरोड मनपा विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजार प्रवेशद्वारावर जुन्या नाल्याच्या स्लॅबला भगदाड पडूनही मनपाकडून दुर्लक्ष होत असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी पूजा करून हार घालून निषेध आंदोलन केले. मनपा विभागीय कार्यालयाशेजारील दुर्गा उद्यान भाजीबाजाराच्या प्रवेशद्वारावरच तीन-चार दिवसांपूर्वी जुन्या नाल्याच्या स्लॅबला भगदाड पडून खोल खड्डा पडला आहे. याबाबत मनपा प्रशासनाच्या सदर बाब लक्षात आणून देऊन सुद्धा दुर्लक्ष केले जात होते. सुरक्षितेच्या दृष्टीने फळविक्रेत्यांनी दुर्घटना होऊ नये म्हणून त्या भगदाडच्या बाजूला फळांचे कॅरेट्स लावून ठेवत होते. मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने सोमवारी सकाळी त्या धोकेदायक भगदाडचे पूजन करून हार घालून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामध्ये मनसे नाशिकरोड विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जुल, संतोष सहाणे, संतोष क्षीरसागर, अतुल धोंगडे, श्याम गोहाड, स्वप्नील कराड, सुनील पाटोळे, प्रसाद घुमरे, चंद्रभान ताजनपुरे, प्रशांत बारगळ आदी सहभागी झाले होते.मनसेच्या निषेध आंदोलनाची दखल घेत मनपा कर्मचाऱ्यांनी काही वेळातच सुरक्षितेच्या दृष्टीने काही वेळातच त्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेट््स आणून उभे करण्यात आले.