नाशिक शहरात ४७ ठिकाणी मिळणार भाजीपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 05:48 PM2020-03-25T17:48:18+5:302020-03-25T17:51:02+5:30
नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन झाल्यानंतर नागरिकांची जीवनावश्यक वस्तू विशेषत: भाज्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने भाजीबाजाराचे स्वतंत्र नियोजन केले आहे. त्या अंतर्गत प्रत्येक विभागात स्वतंत्र भाजीविक्रीच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाउन झाल्यानंतर नागरिकांची जीवनावश्यक वस्तू विशेषत: भाज्या खरेदीसाठी गर्दी होऊ लागल्याने महापालिका प्रशासनाने भाजीबाजाराचे स्वतंत्र नियोजन केले आहे. त्या अंतर्गत प्रत्येक विभागात स्वतंत्र भाजीविक्रीच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
महापालिकेने निश्चित केलेल्या जागा अशा- नाशिक पूर्व विभाग- साईनगर चौक, कलानगर, फुले मार्केट परिसर, उपनगररोड (जॉगिंग ट्रॅकजवळ), गांधीनगर, द्वारका परिसर, आझाद चौक परिसर, नाशिक पश्चिम विभाग- वावरे पटांगण, भद्रकाली, आकाशवाणी टॉवर, गंगापूररोड, शरणपूर भाजी मार्केट, रोकडोबा पटांगण, यशवंत मंडई, रविवार कारंजा, पंचवटी विभाग- आरटीओ कॉर्नर, बोरगड, गंगाघाट परिसर, पेठरोड परिसर, लाटेनगर (हिरावाडी), कोणार्कनगर, निलगिरी बाग, जत्रा हॉटेलसमोर (औरंगाबादरोड), महालक्ष्मी टॉकीजजवळ (दिंडोरीरोड), म्हसरूळ.
सातपूर विभाग- श्री छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई (शिवाजीनगर), डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट (सातपूर कॉलनी), विश्वासनगर भाजी मार्केट (अशोकनगर), गंगापूर गाव भाजी मार्केट, सिडको विभाग- शिवाजी चौक, जुने सिडको, गामणे मळा, पाथर्डी फाट्याजवळ, धनलक्ष्मी शाळेसमोर, साईबाबा मंदिराजवळ, पाथर्डी फाटा, उपेंद्रनगर, त्रिमूर्ती चौक (पाटीलनगर).
नाशिकरोड विभाग- शनि मंदिर, सायट्रिक कंपनीसमोर (पंचक), मंगलमूर्तीनगर (जेलरोड), कॅनॉलरोड, जेलरोडवरील पूर्वेकडील बाजू, मनपा निसर्गाेपचार केंद्राच्या कंपाउंडलगत, म्हसोबा मंदिराजवळ, बिग बाजारमागे खुली जागा, भालेराव मळा, जयभवानी रोड, सोमाणी गार्डन, दुर्गा उद्यानालगत अधिकृत भाजी मार्केट, क्रांती चौक, (बॉस्कोरोड), डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील सर्व्हिस रोडलगत, सिन्नर फाटा येथील अधिकृत भाजी मार्केट, देवळालीगाव आठवडे बाजार, देवळाली गावठाणामागील अस्तित्वातील अधिकृत यशंवत मंडई, मकरंद कॉलनी (जेलरोड).